

Pune News: आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) ते जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण या दरम्यान आखण्यात आलेल्या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावीत बोगद्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
हा बोगदा चुकीच्या पद्धतीने झाल्यास भविष्यात या भागातील शेतीसमोर गंभीर जलसंकट उभे राहील, असा इशारा माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे. हा इशारा देताना वळसे पाटील यांनी भूतकाळात घडलेल्या काही घटनांना उजाळा देत शरद पवारांची साथ सोडत आपण अजित पवारांसोबत का गेलो हे सांगितले आहे.
माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा बोगदा न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्द दिला होता. मंगळवार, दि. १ रोजी निवेदन देताना सरकारला या आश्वासनाची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया वर या भूमिकेबाबत वळसे पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या व्हिडिओत वळसे पाटील म्हणाले, याबाबत मी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन एकदा चर्चा करणार आहे. वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होतो हे पाहायचं आहे त्यानंतर आपण आपली भूमिका निश्चित करायची आहे. हा एखाद्या तालुक्याचा अथवा राजकारणाचा आणि निवडणुकीचा प्रश्न नाही. हा हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी देखील मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या झालेल्या बैठकीत हा कालवा आम्ही होऊन देणार नाही हे आश्वासन दिल्यानंतरच शरद पवार यांची बाजू सोडून मी अजित पवार यांच्या बाजूला आलो होतो. त्यावेळी काही लोकांनी मी फक्त निवडणुकीपुरता बोलत आहे, असा आरोप केला मात्र आता ही परिस्थिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.