Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : ‘चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा वाटतं आता बरं वाटतंय; पण पुन्हा तब्येत बिघडते...’

Maratha Reservation : एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करायचं आहे. ते उपोषण आरक्षण मिळाल्याशिवाय मागे घ्यायचं नाही.

Vijaykumar Dudhale

Chhatrapati Sambhajinagar News : सध्या तब्येत चांगली आहे. एक दिवस तब्येत चांगली वाटते. त्या दिवशी चेहऱ्यावर हसू येतं. दुसऱ्या दिवशी काहीतरी दुखतं, त्यामुळं चेहऱ्यावरील हसू पुन्हा जातं. पण, काळजी करण्याचं काही कारण नाही. माझी तब्येत आता ठणठणीत होत आहे. एक डिसेंबरपासून राज्यात पुन्हा साखळी उपोषणं सुरू करायची आहेत. कारण आपल्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Maratha Reservation : Manoj Jarange Patil talked about his health)

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा वाटतं आता जरा बरं वाटतंय. पण, पुन्हा तब्येत बिघडते. अन्नपचन न होणे, पाणी न पचणे असे प्रकार होत आहेत. डॉक्टरांनी माझ्यावर उत्तम उपचार सुरू केले आहेत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यात ते म्हणाले की, एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करायचं आहे. ते उपोषण आरक्षण मिळाल्याशिवाय मागे घ्यायचं नाही. तसेच, आंदोलनात उद्रेक, हिंसा होऊ द्यायची नाही. याचबरोबर मराठा सामाजातील तरुणांनी आत्महत्याही करायची नाही. येत्या २४ डिसेंबरपासून खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचं आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विषय आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे, तो विसरून चालणार नाही. त्याचबरोबर शेतातील कामेही आपल्याला करायची आहेत, असे आवाहनी त्यांनी मराठा बांधवांना केले.

माझ्या महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम आज तयार होईल. या दौऱ्यातून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हा दौरा उद्या किंवा परवापासून सुरू होईल. संभाजीराजेंच्या भेटीविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राजगाद्यांविषयी आम्हाला आदरच आहे. संभाजीराजे काल येऊन भेटून गेले.

आमदार प्रकाश सोळुंके यांनी मराठा समाजाच्या तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमच्यामध्ये काही गैरसमज नव्हते. तो विषय झाला, संपला आता, पण सोळुंके यांच्यामुळे सर्वसामान्य आंदोलकांना त्रास होऊ नये, एवढी माझी इच्छा आहे, असेही जरांगे यांनी सोळुंकेंच्या भेटीबाबत बोलताना सांगितले.

राज्य सरकारचं शिष्टमंडळ मला उद्या पुन्हा भेटायला येणार आहे, असे सांगून जरांगे म्हणाले की, आम्हाला आंदोलनात सातत्य ठेवावे लागणार आहे. पण, आता आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आम्ही केवळ मराठवाड्यासाठी आरक्षण घेणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रसाठी आरक्षण घेणार आहोत. कोणत्याही एका विभागासाठी आम्ही आरक्षण मागणार नाही, ते राज्यातील संपूर्ण विभागासाठी हवे आहे.

आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा मी सेवक आहे. ते रक्त आपल्यामध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच देशाला दिशा मिळाली आहे. ते विचार डोक्यात घेतल्याशिवाय कुठल्याही वंचित, पिचलेल्या समाजाला न्याय मिळू शकणार नाही. त्या विचारांशिवाय माणसाची आणि एखाद्या समूहाची प्रगती होऊ शकत नाही, असा दावाही जरांगे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT