Loksabha Election : नीलेश लंकेंनी शड्डू ठोकला; लोकसभेसाठी तयार...आता फक्त अजितदादांच्या आदेशाची वाट पाहतोय!

Nilesh Lanke News : अजित पवार गटाची लोकसभेच्या दृष्टीने सुरू केलेली ही चाचपणी मात्र भाजपची डोकेदुखी वाढविणारी आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nagar : नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीची उत्सुकता वाढली आहे. महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार? महायुतीत खासदार सुजय विखेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? अशा चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूंनी वेगवेगळी विधाने होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभेबाबत मोठे विधान केले आहे. 'आमचे नेते अजितदादा आहेत, त्यांनी काही सूचना केल्या आहेत. मतदारसंघात संपर्कात आहे. त्यांचा आदेश होताच आखाड्यात उभा असेल', असे आमदार लंके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केले. (MLA Nilesh Lanke is ready to contest Lok Sabha elections from Nagar South)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो उमेदवार देतील, तो निश्चित असणार आहे. शरद पवार यांनी सुरुवातीला आमदार लंके यांना बळ दिले होते. आमदार लंके यांनीही नगर दक्षिणमध्ये जनसंपर्क वाढवला होता. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Konkan Politics : तटकरेंविरोधात शरद पवारांची विशेष रणनीती; पनवेलच्या सभेत घेणार समाचार

अजित पवार यांनीही आमदार लंके यांच्या घरी जाऊन बळ दिले आहे. आधुनिक श्रावण बाळ असे म्हणत अजितदादांनी आमदार लंके यांचे कौतुक केले होते. अजितदादा डेंगीने आजारी आहेत. दिवाळीनंतर अजित पवार आणि त्यांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी करत आहेत. यात लोकसभेचीही चाचपणी होणार आहे. अजितदादा गट हा महायुतीत असला, तरी यात नगर दक्षिणचा विचार होणार आहे.

आमदार नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत मोठे विधान केले आहे. आमचे नेते अजितदादा आहेत. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार मतदारसंघात संपर्कात आहे. त्यांचा आदेश होताच आखाड्यात येईल, असे त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना म्हटले आहे. लंके हे शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी चर्चा होते. मात्र, लंके यांनी हे विधान करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून त्यांच्या नावाच्या होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Nilesh Lanke
Gram Panchayat Election : हर्षवर्धन पाटलांना स्वकीयांनीच घेरले...

राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत सत्तेत आहे. अजित पवार आणि त्यांचे नेते दिवाळीनंतर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. लोकसभेची तयारी, हा त्याचा भाग आहे. अजित पवार गटाची लोकसभेच्या दृष्टीने सुरू केलेली ही चाचपणी मात्र भाजपची डोकेदुखी वाढविणारी आहे. महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटही लोकसभेसाठी उत्सुक आहे. भाजप महायुतीत जागा वाटपावरून मोठे नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

आमदार लंके संपर्कात...

आमदर नीलेश लंके हे शिवसेनेच्या तालमीत तयार झाले आहेत. राष्ट्रवादीत असले, तरी अजूनही आमदार लंके हे नगर दक्षिणमधील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांचा हा संपर्क चर्चेत आहे. शिवसेना-भाजपमधील खदखद राज्यपातळीवरच नाही, तर स्थानिक पातळीवरदेखील आहे.

Nilesh Lanke
Rajasthan Assembly Election : राजस्थानच्या निवडणुकीत शिंदे गट उमेदवार उभे करणार; बडा नेता शिवसेनेच्या गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com