Marathwada NCP News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंचे नेते, सत्तेतील मंत्री सभा, मेळावे घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. (Maratha Reservation News) विशेषतः मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळते. या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मराठवाड्यातील संपर्क प्रमुख माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही उडी घेतली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे क्रिमिलेअर आहेत, त्यांनी उगाच ओबीसी नेते होण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात टीका केली आहे. सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेच्या विरोधात वागत, बोलत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षण आंदोलनाला बहर येतो आहे, तसा भुजबळांच्या आरडाओरड करण्याचा कहर वाढत आहे. माझे माननीय भुजबळ यांच्याबद्दल अतिशय चांगले मत होते, आजही आहे.
परंतु मनोज जरांगे पाटील यांना किरकोळ समजणे, दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणारा म्हणणे, सासऱ्याच्या घरचे तुकडे मोडणारा समजणे, माझ्या शेपटीवर पाय न देण्याचा सल्ला देणे, ही भाषा भुजबळांच्या तोंडी शोभते काय ? भुजबळसाहेब आपण तोंडाची वाफ घालवून काय साध्य केलतं ? मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या मगण्या सरकारकडे करत आहेत. (NCP) त्या कशा द्यायच्या, कशातून पुर्ण करायच्या, किती प्रमाणात द्यायच्या, कधी द्यायच्या हा शिंदे सरकारचा विषय आहे. (Maharashtra) आपण त्यात लुडबूड का करत आहात?, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थीत केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण मुख्यमंत्र्याच्या विरोधी भूमिका घेत आहात. आपण मंत्री पदाची घेतलेली शपथ मोडत आहात आणि तरीही मंत्री आहात हे मला विसंगत वाटतयं. मराठा आरक्षण आंदोलन विरोधात ओबीसी समाजाचे मेळावे घेऊन त्यात अनेक सांदीला पडलेले व पढवलेले नेते आग्रह करून आपण बोलावले. आणि आपणा सहित सर्वांनी गरळ ओकली. हात पाय तोडू, कोयते चालवू ही भाषा तुम्ही वापरली. जसे तुम्ही युद्ध भूमीत सीमेवर लढण्यासाठी उभे आहात.
साहेब आपलं भुजबळ हे नाव मी इतिहासात कुठे वाचलं नाही. भुजबळ साहेब आपण समता परिषदेचे अध्यक्ष आहात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा असणाऱ्या सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे आहेत. तुम्हाला मी विनंती करतो की आपण क्रिमिलेअर आहात, बळेच ओबीसी नेते होऊ नका. ओबिसित शेकडो जाती आहेत ज्या यादी वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार सुद्धा नाहीत, असा टोलाही गायकवाड यांनी भुजबळांना लगावला आहे.
तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, की भिती वाटते?
मराठयांचे या देशातील समाजाच्या रक्षणात व भरण पोषणात फार मोठे योगदान आहे. राज्यकर्त्यांनी तुम्हालाही सर्वांना मानाने पहिल्या पंगतीत बसवून भरलेले ताट सन्मानाने समोर ठेवलेलं आहे. मराठा शेवटच्या पंगतीत बसत आहे, तुम्हाला हे ही पाहवत नाही. इथे एक तीळ सात जणांनी खायची संस्कृती आहे हे सोईस्करपणे आपण विसरलात ! भुजबळ साहेब आपण मोठे आहात मी आपला आदर करतो चांगल्याला धरून आणि वाईटाला चिरून बोलण्याची हातोटी आपल्याकडे आहे. परंतु आपली जीभ कशी घसरली हा संशोधनाचा विषय आहे.
अस बोलण्यासाठी आपणावर कोणाचा दबाव होता काय ? का मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडावी म्हणून आपला कोणी वापर करीत आहे ? का आपली जमानत रद्द होईल याची आपणास भीती आहे ? असा चिमटाही जयसिंगराव गायकवाड यांनी भुजबळांना काढला. मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्ये ही प्रतिक्रिया आहे. आणि आपण व आपले सहकारी जेवढे विकृतपणे बोलाल तेवढी ती उमटेलच उमटेल.
भुजबळ साहेब आपण सुज्ञ आहात, समजुतदार आणि विचारी आहात, आपण मंत्री म्हणून सर्व समाजाचे प्रतीनिधित्व करत आहात. मराठ्यांबद्दलचा आकस भाव सोडून झालं गेलं विसरून कोट्यवधी संख्येतील मराठा आंदोलकांना साथ द्या. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी व्हा, तुमच्या आयुष्याचं सोने होईल. तुम्हाला बरकत येईल, असे आवाहनही गायकवाड यांनी भुजबळांना केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.