Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama

Maratha Reservation: मराठा आरक्षणात नवा अडथळा ; उद्या सुनावणी

Curative Petition: जयश्री पाटील क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार
Published on

New Delhi : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. राज्यभर त्यांचा दौरा सुरु आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रांची मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने नेमलेल्या मागसवर्ग आयोगाला गळती लागली आहे. अशात मराठा आरक्षणासंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाबाबत क्युरेटीव्ह पीटीशन बाबत उद्या (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला लिस्ट करण्यात आले आहे. याचिकेवर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली होती

Maratha Reservation
Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना अटक

भाजप समर्थक दांपत्य जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांची ओळख आहे. त्यांच्याकडून मराठा आरक्षणाला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण देणारच असा विश्वास शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आंदोलकांना दिला आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 20 एप्रिल 2023 ला वाजता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली होती.

यावेळी मराठा आरक्षणाचा निकाल देणारे सर्व न्यायाधीश देखील उपस्थित होते. न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार करणं का गरजेचं आहे? यावर चर्चा झाली. त्यानंतर या याचिकेवर झालेल्या चर्चेनंतर सुनावणी घ्यायची की नाही यावर न्यायाधीश चर्चा करून निर्णय देणार होते. हे प्रकरण कोणत्या घटनापीठाकडे वर्ग करायचे याचा निर्णय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड घेणार होते. मात्र, मराठा आरक्षणाबाबतची रिव्ह्युव्ह पीटीशन फेटाळल्यानं घटनापीठ तयार करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

Maratha Reservation
Thackeray Group News: ठाकरे गट-पोलिसांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर झटापट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com