Maratha Reservation News  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सरपंचाने स्वतःची कार जाळून केला निषेध..

नवनाथ इधाटे

Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठी हल्ला केला. या घटनेचे तीव्र पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. (Maratha Reservation) जाळपोळ, दगडफेक, रास्तारोको, बंदचे आवाहन अशा विविध प्रकारे आंदोलक आपला संताप व्यक्त करत आहेत. इकडे फुलंब्री तालुक्यात मात्र एका सरपंचाने वेगळ्याच पद्धतीने सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला.

भर रस्त्यात स्वतःची काळ जाळून आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा या सरपंचाने निषेध केला. (Maratha Reservation) कार जाळून राग व्यक्त करणाऱ्या या सरपंचाची आता सर्वत्र चर्चा होत असून या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला आहे. (Aurangabad) फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वी घेतलेली स्वतःची नवी कोरी गाडी पाल फाटा परिसरात जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान फुलंब्री येथील महात्मा फुले चौकातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मागील गेल्या काही वर्षापासून राज्यभर सातत्याने सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले लाखोचे मोर्चे शांततेत झाले. (Maharashtra) याला कुठेही गालबोट लागली नाही. त्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

यात अनेक आंदोलक जखमी झाले. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. या सरकारने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावल्याचा आरोप आता केला जातोय. या प्रकरणावरून वातावरण तापलेले असतांनाच फुलंब्री तालुक्यातील महात्मा फुले चौकातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

सदरील आंदोलन संपल्यानंतर सातत्याने चर्चेत राहणाऱ्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वर्षभरापुर्वी खरेदी केलेली रेनोड कंपनीची गाडी पाल फाटा येथे पेट्रोल टाकून जाळली. सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. या आंदोलनात मंगेश साबळे यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ बेडके, वसंत पाथ्रीकर यांनी सहभाग घेतला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT