Maratha Reservation News : शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालवता, मग आरक्षण का देत नाही ?

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalan News : न्याय ,हक्क, आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजावर सरकारने अमानुष हल्ला केला. आरक्षण दिले नाही उलट लाठी चार्ज, अश्रू धुराचा वापर करूण आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न कले. (Maratha Reservation) याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालवता, मग मराठा आरक्षण का देत नाही? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Maratha Reservation Protest News
Jalna Maratha Protest : जालन्यात असं काय घडणार होतं की प्रशासनाने हे टोकाचं पाऊल उचललं ? राज ठाकरे सरकारवर संतापले..

अंतरवाली सराटी येथे त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची आज भेट घेतली. (Jalna) जखमीची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. गरीब समाजाला राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी आरक्षण दिले. (Chhatrapti Sambhajiraje ) मराठा आरक्षणासाठी समाजाने ५८ मोर्चे काढले व शांततेत पार पाडले. तरीही शासनाने आरक्षण दिले नाही.

आता राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे, मग आरक्षण का देत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अंतरवाली येथे चार दिवसापासून शांततेत आंदोलन चालू होते. (Marathwada) पोलीसांनी बळाचा वापर करूण अमानुष हल्ला केला, बेदम मारहाण केली. प्लेनेट गनमधून फैरी झाडल्या, अश्रू धुराचा लोकांवर वापर केला याचा मी निषेध करतो. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चावलतात, मग आरक्षण का देत नाही.

ज्यांनी हल्ला केला त्यांना निलबंत करा, आरक्षण कसे मिळवून देणार ते सांगा. गोळ्या घालने चुक आहे का बरोबर हे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी जनतेला सांगावे. उपोषणाला पाठींबा व साथ देण्यासाठी आलो आहे .मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री काय बोलतात याची आम्ही वाट पाहत आहोत, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मुख्य उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना या वेळी आधार दिला व सोबत असल्याचे सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com