Laxman Hake on manoj jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Laxman Hake : आता तुम्ही ओबीसीत आला पहिले 11 विवाह आपापसात ठरवुया! भरस्टेजवरून लक्ष्मन हाकेंनी जरांगेंना प्रस्ताव देत डिवचलं, म्हणाले, "पाटील, 96 कुळी..."

OBC Leader Laxman Hake On Maratha Reservation : लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय, जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Jagdish Patil

Beed News, 13 Sep : लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय, जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईतील शृंगारवाडी येथे पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच या मेळाव्यात बोलताना त्यांनी थेट ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.

मनोज जरांगेंना उद्देशून हाके म्हणाले आता तुम्ही मागास झाला आहात आता कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात तर आम्ही आमच्यातील काही 11 पोरं सुचवतो त्यांचा विवाह आपल्यामध्ये ठरवूया. आता जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे 11 विवाह जाहीर करू, असं म्हणत जरांगे यांना थेट ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जरांगेंना दिला.

तर लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर ते म्हणाले, लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, मागासवर्गीय आहोत. हे मी बोलत नाही तर हे स्वर्गीय एन.डी पाटील बोलायचे, असा दाखला देत. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका हाके यांनी जरांगेंसह मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठ्यांवर केली.

दरम्यान, याच मेळाव्यातून बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं. ते म्हणाले, अजित दादा मी गाजत वाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे, असं म्हणत थेट अजितदादांना डिवचलं. तसंच बीड जिल्ह्यातील मराठा आमदार खासदारांवर टीका केली. गेवराईचा आमदार जातीवादी आहे. चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती? तुमच्यात लय दम असला तर फक्त पदाचा राजीनामा द्या असं म्हणत त्यांनी आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT