Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बलिदान, उपोषण सुरू असतानाच आले मरण...

Prasad Shivaji Joshi

Hingoli Movment News : राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे दुःखात असलेल्या समाजाला आणखी एक धक्का बसला आहे. (Maratha Reservation) हिंगोली येथे आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान, एका उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील प्रकाश नामदेव मगर (वय ५५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करत होते. (Marathwada) उपोषणादरम्यान त्यांना चक्कर आल्याने उपस्थितांनी त्यांना तातडीने पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी हिंगोली येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ देत बेमुदत उपोषण स्थगित केले. (Maratha Reservation) तसेच राज्यातील अनेक गावात चालू असलेले बेमुदत उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू ठेवावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सिंदगी या गावी मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण सुरू होते. उपोषणादरम्यान प्रकाश मगर यांना दुपारी तीन वाजता चक्कर आली. उपस्थितांनी उपचारासाठी त्यांना तातडीने पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी हिंगोली येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्रकाश मगर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्याच्या विविध जिल्ह्याxत आंदोलनादरम्यान पंधराहून अधिक तरुणांनी बलिदान दिले. यात एका तरुणीचाही समावेश आहे.

एकाने संपवले जीवन...

मराठा आरक्षणाबाबत शासन वेळकाढूपणा करीत असल्यामुळे नैराश्यातून नांदगाव (ता. चाकूर) येथील तुकाराम रघुनाथ मोरे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. ४) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आष्टामोड येथे समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या साखळी उपोषणातही त्यांनी भाग घेतला होता. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार वेळ काढूपणा करीत असून, समाजाला आरक्षण मिळणार की नाही याबाबत ते चिंतेत होते. ॉ

शुक्रवारी रात्री त्यांनी याबाबत कुटुंबासोबत चर्चा ही केली असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. याच नैराश्यामध्ये त्यांनी शनिवारी सकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्यावी, या मागण्याचे निवेदन सकल मराठा समाजाने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना दिले. या बाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT