Maratha Reservation News : मराठा समाजाला न्याय मिळणारच; जरांगे पाटलांनी आता प्रकृतीची काळजी घ्यावी...

Guardian Minister News : मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने समितीही कामकाज करीत आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत उपोषण नवव्या दिवशी स्थगित करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरात उपचार घेत आहेत. (Maratha Reservation News) तिथेही त्यांची भेट घेण्यासाठी रीघ लागली आहे. आज सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची प्रत देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे रुग्णालयात आले होते.

Maratha Reservation News
Marathwada Political News : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार एकत्र येणार का ?

मराठवाड्यातील (Marathwada) मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय दि.३ नोव्हेंबर रोजी निर्गमित झाला आहे. (Maratha Reservation) या निर्णयाची प्रत आज शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

जरांगे पाटील यांनी या शासन निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे. उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील हे येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

शासन आमच्या मागणीसंदर्भात गांभीर्याने काम करीत आहे. समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी झाल्याने राज्यभरातील समाज बांधवांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. आपली प्रकृती आता चांगली असून, मी लवकरच बरा होईन,असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने तातडीने या समितीची व्याप्ती राज्यभर करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने विश्वास वाढला आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे कामकाज सुरू आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने समितीही कामकाज करीत आहे. शासनाच्या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील हेसुद्धा समाधानी आहेत. त्यांनी आता आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन भुमरे यांनी केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णयानुसार, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते अनिवार्य दस्तावेज, पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना तसे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. तसेच या समितीने आपला अहवाल दि.२४ डिसेंबर २०२३ पर्यंत शासनास सादर करावा असे नमूद केले आहे. शासन निर्णयानुसार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) असून, अपर मुख्य सचिव (महसूल), प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सदस्य असून, सह सचिव सामान्य प्रशासन विभाग हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.