Jalna Political News : मराठा समाजाने सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठं केलं. वर्षानुवर्षे त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, राबलो आता मराठ्यांच्या पोरांचं भल करा. (Manoj Jarange Patil News) मराठा समाजाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही आता समाजाला मोठं करा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात आडवे येण्याचे पाप आता कुणीही करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
अंतरवाली सराटी येथे येत्या १४ आॅक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी भव्य सभा घेणार आहेत. (Jalna) शंभर एकर जागेवर ही सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी आपण सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली असल्यामुळे आता काहीच बोलणार नाही.
सरकारने तीस दिवस मागितले होते, आम्ही अतिरिक्त दहा दिवस दिले. त्यामुळे आता मराठा आरक्षण (Maratha Reservaiton) घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने तब्बल ६५ लाख अभिलेखांची तपासणी केली. (Marathwada) त्यात केवळ पाच हजार नोंदी सापडल्याचे जरांगे यांच्या निदर्शनास आणून दिले, तेव्हा हे पुरावे खूप झाले एवढ्याचीदेखील गरज नव्हती, असे ते म्हणाले.
२००४ च्या जीआरमध्ये दुरुस्ती करून मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याद्वारे आरक्षण देता येऊ शकते. त्यामुळे खरंतर सरकारने समिती नेमण्याचीही आवश्यकता नव्हती. पण त्यांना न्यायालयात आरक्षण टिकावे म्हणून पुरावे आवश्यक आहेत, म्हणून समिती नेमली असे सांगतात. त्यामुळे हरकत नाही, पण जे पाच हजार पुरावे मिळाले आहेत, त्या आधारे सरकारने आता सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षण लागू करावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
मराठा समाजाने सगळ्याच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना मोठं केलं आहे. आता आमच्या समाजाच्या पोरांचं भलं करण्याची वेळ आली आहे. तेव्हा त्याला कोणी विरोध करून पापाचे धनी होऊ नये, असे आवाहन करतानाच राज्यात मराठा आंदोलकांना भेटण्यासाठीचा दौरा आपण लवकरच सुरू करणार आहोत, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.