Maratha Reservation : मराठा आरक्षण ओबीसीमधूनच हवे म्हणून मनोज जरांगे-पाटील आग्रही आहेत. तर, मराठ्यांना आरक्षण द्या मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का नको, अशी भूमिका ओबीसी नेत्यांकडून मांडली जाते. आज (सोमवारी) ओबीसी नेते, अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल, असे सांगत आरक्षणाचा फाॅर्म्युला सांगितला.
ओबीसीला 27 टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाला 9 टक्के आरक्षण देण्यात यावे, 9 टक्के भटक्या जमातींसाठी तर, 9 टक्के बारा बलुतेदारांसाठी असा फाॅम्युला हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. मात्र, जरांगे पाटील यांना हा फाॅम्युला अमान्य करत मराठ्यांची लोकसंख्या 40 टक्यांपेक्षा अधिक आहे. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे. या फाॅम्युल्यामुळे अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार मग अर्ध्या समजाला मी अंगावर घेऊ का? नाही जमणार, असे जरांगे म्हणाले.
27 टक्के ओबीसी आरक्षणात मराठे आले तर हे आरक्षण पुरेसे ठरणार नाही, त्यामुळे आधी ओबीसींचे आरक्षण वाढवण्यासाठी लढा दिला पाहिजे, असे हरिभाऊ राठोड म्हणाले. मात्र, जरांगे यांनी हरिभाऊ यांचे म्हणणे फेटाळत आधी आम्ही ओबीसीमधून येऊ आणि मग आरक्षण वाढवण्यासाठी लढा देऊ, असे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षणाच्या मागणीत 'सरसकट' या शब्दावरून काही ओबीसी बाऊ करत आहेत. आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण द्या, अशी मागणी सगळ्या गाव खेड्यात होत आहे, असे सांगत लोकसंख्येच्या प्रमाणातच आरक्षण हवे आणि ते ही ओबीसीमधूनच, या आपल्या मागणीवर जरांगे-पाटील ठाम राहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.