Sachin Ahir News : मावळमधून ठाकरेंचाच उमेदवार लोकसभेत जाणार, राष्ट्रवादीचं...; सचिन अहिरांचा दावा

Meeting on Matoshree : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांसोबत 'मातोश्री'वर बैठक.
Sachin Ahir
Sachin AhirSarkarnama
Published on
Updated on

Sachin Ahir News : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून आणणार , असे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार असून त्यांच्याविरोधात आता ठाकरे गटाने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या जागेसाठी शरद पवार यांचा गटही आग्रही असल्याचे समजते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 'मातोश्री'वर झाली. त्या संदर्भात शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय लवकरच होईल.

Sachin Ahir
Kolhapur Loksabha 2024 : कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे? 'मविआ' उमेदवाराचा सस्पेन्स कायम

मात्र, ही जागा जिंकून आणण्यासाठी आजची महत्त्वाची चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या पक्षातील काही जण उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. तर इतर पक्षातील सुद्धा नेते आमच्या पक्षात येण्यास तयार आहे. जो उमेदवार दिला जाईल त्याला बहुमताने निवडून आणणार अशी ग्वाही, अहिर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप जागावाटप झालेले नसताना आता प्रत्येक पक्षाकडून चाचपणी करुन त्या ठिकाणच्या जागेवर दावा केला जातोय. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघावर आमचा अधिकार असून ती जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने घेतली आहे. तर राष्ट्रवादीचा शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाच्या दाव्यानंतर एकीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा वाद सुरू असताना आता मावळच्या जागेवरून पुन्हा एकदा मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. बारणे यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.

आता त्या ठिकाणी ठाकरे गटाने दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडूनही याठिकाणी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अहिर म्हणाले, ते फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाहीत.

Sachin Ahir
Chandrapur Forest Academy : वन अकादमीला मिळाले प्रतिष्ठेचे ‘थ्री स्टार’ मानांकन

मात्र सत्तेत सहभागी होण्यापूर्वीची त्यांची भाषणे ऐकावीत, ते आता काय बोलतात आणि आधी काय बोलायचे हे कळेल. लोक बघतात आणि सोशल मीडियासुद्धा पावरफुल झालाय. त्यांची मोदींवरची भाषणे जर का आपण पाहिली तर लोक जागरूक आहेत हे दिसते.

दिशा सालियन प्रकरणी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, एसआयटीतल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी होत आहे. यावरून भाजप आमदारांचा स्वतःच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Sachin Ahir
MLA Sanjay Shirsat News : राम मंदिराचे स्वप्न साकार होत असताना ठाकरेंनी मिठाचा खडा टाकू नये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com