Bjp State President Bawankule-Dashrathe News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : सात महिन्यानंतर अखेर भाजपने दाशरथेंवर सोपवली जबाबदारी..

Bjp Aurangabad : या अभियानातून दोन कोटी नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे उदिष्ट आहे.

सरकारनामा ब्युरो

Bjp Aurangabad News : शिवसेना, मनसे आणि त्यानंतर सात महिन्यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुहास दाशरथे यांना तब्बल सात महिन्यांनी पक्षाने जबाबदारी दिली आहे. Bjp भाजपच्या 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी' या अभियानाच्या मराठवाडा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाशरथे यांना दिले.

३५ वर्ष शिवसेनेत आणि त्यानंतर ३ वर्ष मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या सुहास दाशरथे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १० महिन्यांपुर्वी अचनाक उचलबांगडी केली होती. (Chandrashekhar Bawankule) त्यानंतर चार महिने वाट पाहत दाशरथे यांनी माझी काय चूक झाली अशी विचारणा राज ठाकरे यांच्याकडे केली होती. (Marathwada) मात्र पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच दाशरथे यांनी एप्रिल २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत दाशरथे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले होते. परंतु सात महिने त्यांच्यावर पक्षाने कुठलीच जबाबदारी सोपवली नव्हती. आता सात महिन्यांनी त्यांची फ्रेंड्स ऑफ बिजेपीच्या मराठवाडा संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमध्ये हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून या माध्यमातून सोशल मिडियावर राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या समाजातील विविध घटकांना जोडण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

या अभियाना अंतर्गत मराठवाडा तसेच संपूर्ण राज्यभरात 'सोशल मीडिया वारीअर्स' तयार करण्याची, नियुक्त करण्याची जबाबदारी दाशरथे यांच्यावर असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.

डॉकटर,वकील,साहित्यिक अशा वर्गाला भाजपबद्दल आत्मीयता आहे पण तो पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही,अशा नागरिकांना `फ्रेंड्स ऑफ बीजेपी` या अभियानातून पक्षाशी जोडण्यात येणार आहे. या अभियानातून दोन कोटी नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे उदिष्ट आहे. या निवडीबद्दल शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या वतीने दाशरथे यांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT