Marathwada Political News : सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता पुन्हा नवी घोषणा केली आहे. Aurangabad ती म्हणजे आपल्याला आता राजकारणात काही नको, पण तुम्हाला हवा असणारा आमदार माझा मुलगा आदित्यवर्धनच्या रुपाने जाधव कुटुंब तुम्हाला २०२९ मध्ये देईल, अशी घोषणा त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.
सातत्याने भूमिका बदलणारे पण योग्य टायमिंग साधत भाव खावून जाणारे राजकीय नेतृत्व म्हणून हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्याकडे पाहिले जाते. कन्नड सोयगांव मतदार संघातून ते दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. (Shivsena) मनसे आणि शिवसेनेकडून आमदार राहिलेल्या जाधव यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्याच विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली आणि तब्बल २ लाख ८३ हजार मते घेत शिवसेनेच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली होती.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना याची किमंत पराभव पत्करत मोजावी लागली होती. दरम्यान, कौटुंबिक आणि वैयक्तिक वादामुळे जाधव कायम चर्चेत राहिले. माजी आमदार असतांना देखील त्यांनी कन्नड मतदारसंघातील अनेक विषयावर आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यामुळे ते २०२४ च्या तयारीला लागल्याचे स्पष्ट दिसत होते.
अशातच पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले आणि त्यांनी आपल्याला खासदरकी, आमदारकी नको अशी भूमिका काही दिवसांपुर्वी घेतली होती. काल सोशल मिडियावर पुन्हा त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पण तो करत असतांनाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव कुटुंब तुम्हाला हवा असलेला आमदार माझा मुलगा आदित्यवर्धनच्या रुपाने देणार, असे देखील सांगून टाकले.
त्यामुळे आपला पुढचा राजकीय वारसदार हा आपला मुलगा असेल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता कन्नडचे मतदार आदित्यवर्धन यांना आपला आमदार म्हणून स्वीकारणार का? आणि २०२४ मध्ये हर्षवर्धन जाधव काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.