औरंगाबाद : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे देगलूर मार्गे महाराष्ट्रात आगमन झाले. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून ही यात्रा मध्यप्रदेशात रवाना झाली. पण या दरम्यान, काॅंग्रेसच्या मराठवाड्यातील दोन नेत्यांच्या बेबनावाच्या चर्चांना उधाण आले होते. ते म्हणजे नांदेडचे अशोक चव्हाण आणि लातूरचे अमित देशमुख. भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची स्वतंत्र जबाबदारी या दोन्ही नेत्यावर सोपवण्यात आली होती.
नांदेडचे नियोजन चव्हाण तर हिंगोलीचे देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे होते. त्यामुळे या दोघांनी त्यात ढवळाढवळ न करता तिकडे जाणे देखील टाळले होते. यामागे लातूरच्या देशमुख विरुद्ध नांदेडच्या चव्हाण (Ashok Chavan) यांच्यातील राजकीय मतभेदाचे कारण असल्याचे सांगितले जात होते.
महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर आता देशमुख आणि चव्हाण या दोघांनी भारत जोडो यात्रे दरम्यान आमच्यातील मतभेदाच्या चर्चा आणि प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचा दावा केला आहे.
अमित देशमुख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या सगळ्या चर्चा अर्थहीन आणि तथ्यहीन असल्याचे सांगत आमचं बरं चाललंय हे काहीजणांना बघवत नाही, असे म्हटले होते. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमित देशमुख यांच्या फेसबुक पोस्टचा हवाला देत अशोक चव्हाण यांनी ट्विट केले आहे.
यात ते म्हणतात, भारत जोडोच्या अनुषंगाने मी व आमचे सहकारी अमितजी देशमुखांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या निराधार व कपोलकल्पित आहेत. याविषयी अमित देशमुख यांनी फेसबुकवर मांडलेली भावना हीच वस्तुस्थिती असून, त्यांच्याशी मी पूर्णतः सहमत आहे, असे चव्हाणांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.