Marathwada BJP News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada BJP News : खैरेंनी खूप सेवा केली, आता निवडणुकीचा खटाटोप करू नये..

Chandrakant Khaire News : चंद्रकांत खैरे हे चारवेळा लोकसभेवर निवडून गेले ते तेव्हा त्यांच्यासोबत भाजप होता म्हणूनच.

Jagdish Pansare

Shivsena V/S Bjp : खैरेंनी जनतेची खूप सेवा केली आता त्यांनी निवडणूक लढवण्याचा खटाटोप करू नये. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी डॉ. भागवत कराड यांना मिळेल तेव्हा मिळेल, आम्ही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, असे समजून मैदानात उतरणार आहोत. (Marathwada BJP News) तेव्हा खैरे किंवा त्यांच्या पक्षाला मोदीजींना पराभूत करणे जमणार आहे का ? असा सवाल भाजपने केला आहे.

शिवाय खैरेंनी 25 वर्ष जनतेची खूप सेवा केली आता त्यांनी निवडणूक लढवण्याचा खटाटोप करू नये, असा सल्लाही भाजपचे मराठवाडा संयोजक सुहास दाशरथे यांनी दिला आहे. (BJP) छत्रपती संभाजीनगर व जालना लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक जबाबदारी आल्यानंतर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) माध्यमांशी पहिल्यांदा बोलले. यावेळी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून भागवत कराड कामाला लागले आहेत या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना खैरेंनी त्यांची खिल्ली उडवली.

शिवसेनेने माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्याचा या मतदारसंघात पराभव केला आहे. (Shivsena) त्यामुळे कराड यांनी कितीही तयारी केली तरी त्यांचा शिवसेनेसमोर टिकाव लागणार नाही. ते आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात, अशी टीका खैरे यांनी केली होती. या टीकेला आता भाजपकडूनही जशासतसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रकांत खैरे हे चारवेळा लोकसभेवर निवडून गेले ते तेव्हा त्यांच्यासोबत भाजप होता म्हणूनच. पैकी दोन निवडणुकीत तर मोदींच्या नावावरच त्यांना मते मिळाली, तेव्हा भाजपचा त्यांच्यासमोर टिकाव लागणार नाही, असे धाडसी विधान त्यांनी न केलेलेच बरे. शिवाय आता तुमच्याकडे पक्षाचे नाव, चिन्हही नाही, तर दुसरीकडे राज्यात आता भाजप, शिवसेनेच्या सोबतीला राष्ट्रवादीही आली आहे.

त्यामुळे खैरे यांनी आता पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहू नये. खैरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाची स्थिती शोलेतील जेलर असरानीसारखी झाली आहे. `आधे इधर जाव, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ`, पण खैरे यांच्या मागे आता कोणीच नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात दाशरथे यांनी खैरे यांना उत्तर दिले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT