Loan Recovery Harassment  Sarkarnama
मराठवाडा

Marathwada drought : 'शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली नकोच, इतर कारणांसाठी जायचे असेल तरी सरपंच, पोलीस पाटील यांना सूचना करून जावे'; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Farmers loan recovery: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वित्तीय संस्थांना बजावले. गावभेटीपूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देण्याचेही निर्देश दिले.

Jagdish Pansare

Marathwada Drought News : मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, अशा परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्या व काही बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. यातून मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारने दुष्काळामध्ये कुठल्याही वितीय कंपन्या, मायक्रो फायनान्स संस्था बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे जाऊ नये, असे आदेश काढले आहे. एवढेच नाही तर असा प्रकार कुठे आढळला तर संबंधित कंपनीविरोधात गुन्हा नोंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ३ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बैठक घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वसूली करु नये असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करु नये,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. री विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मायक्रो फायनान्स कंपनी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच बिगर बॅंकींग वित्तीय संस्थाही यावेळी उपस्थित होत्या. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे तसेच कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची व ग्रामिण भागाची भीषण स्थिती आहे. अशा परिस्थितीत त्यांचे कर्ज अथवा अन्य प्रकारची वसूली करण्यासाठी सक्ती करु नये. त्यासंदर्भात रिजर्व बँकेच्या मार्गदर्शक सुचना आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसूली करण्यात येऊ नये. तसेच अशा संस्थांना आपल्या अन्य व्यावसायिक कारणांसाठी गावकऱ्यांकडे जावयाचे असल्यास त्यांनी संबंधित गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी यांना सुचना देऊन जावे,असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील शेतकरी वा ग्रामस्थांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून वसूलीसाठी तगादा वा सक्तीचा अवलंब केला जात असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT