Marathwada Drought News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Drought News : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ११ तालुक्यांना दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत, इतरांचे काय ?

Jagdish Pansare

Marathwada News : राज्यात ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून बराच वाद सुरू आहे. विरोधकांकडून सत्ताधारी आमदार, मंत्र्यांच्याच मतदारसंघातील तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. (Marathwada Drought News) तर दुसरीकडे अनेक मंत्र्यांच्या मतदारसंघातील तालुक्यांना वगळण्यात आले म्हणून मोर्चे, आंदोलने केली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या (Beed) बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या ११ तालुक्यांना दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत आणि दिलासा देण्यात येणार आहे. (Dhnanjay Munde) कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात निर्णय झाला, तर राज्यातील इतर भागात कधी होणार? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. (Marathwada) दि. ३१ ऑक्टोबर रोजी महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर व वडवणी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते.

राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. (Maharashtra) बैठकीनंतर बीड जिल्ह्यातील उर्वरित परळी वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, बीड, पाटोदा, शिरूर कासार व माजलगाव या आठही तालुक्यांतील एकूण ५२ महसुली मंडळांचा दुष्काळग्रस्त म्हणून यादीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी बीड जिल्ह्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, ऐन रब्बीच्या तोंडावर जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत कोरडे पडतील अशी परिस्थिती आहे. आगामी काळात पिण्याचे व जनावरांना पाणी, चारा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून विचार झाल्याने या भागाला शासनाकडून दुष्काळाच्या मापदंडानुसार मदत व दिलासा मिळणार आहे. याबद्दल ही एक समाधानाची बाब आहे. याबाबत राज्य शासनाचे मी मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहे.

आता कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्याला जो न्याय, तोच इतर जिल्ह्यांनाही मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागे आहे. या बैठकीला छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे हे मंत्रीही उपस्थितीत होते. विशेष म्हणजे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणेवारी ५० टक्यांपेक्षा कमी असूनही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारबद्दल रोष आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT