Marathwada Drought News : दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळले, मंत्री सत्तार, भुमरेंच्या तालुक्यात आंदोलन...

Shivsena-NCP News : मराठवाड्यातील या दोन मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा, म्हणून होणाऱ्या या आंदोलनाची चर्चा होत आहे.
Marathwada Drought News
Marathwada Drought NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या मंत्री, आमदारांच्या मतदारसंघांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. (Marathwada Drought News) मात्र, राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो तथा फलत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघही दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्हीही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चा, रास्ता रोको करण्यात येणार आहे.

Marathwada Drought News
Nana Patole on Government : नालायक, बधिर सरकारला जनताच धडा शिकवेल

पैठण (Paithan) तालुक्यामध्ये संदीपान भुमरे यांनी संयम दाखवला असला तरी राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) दत्ता गोर्डे पाटील यांनी मात्र दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी उद्या (दि.१०) रोजी रास्ता रोको करण्याची घोषणा केली आहे. (Shivsena) तिकडे अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर यांनी ११ नोव्हेंबर रोजी सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील या दोन्ही मंत्र्यांच्या मतदारसंघात आपल्याच सरकार विरोधात आंदोलन केली जाणार असल्यामुळे विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. (Abdul Sattar) सत्तार यांच्या सिल्लोड- सोयगावपैकी सोयगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, परंतु सिल्लोडला या यादीतून वगळण्यात आले आहे. समीर सत्तार यांच्या दाव्यानुसार सिल्लोड तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असतानाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून सिल्लोडला वगळण्यात आले.

शेतकऱ्यांवरील या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे पैठण मध्ये संदीपान भुमरे यांचे राजकीय विरोधक दत्ता गोर्डे यांनी ही संधी साधत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोकोची तयारी केली आहे. उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता पैठणमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील या दोन मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा, म्हणून होणाऱ्या या आंदोलनाची चर्चा होत आहे.

एकीकडे राज्य सरकारकडून ट्रिपल इंजिनचे सरकार, वेगवान सरकार अशी जाहिरातबाजी केली जाते, तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच मंत्र्यांच्या तालुक्यात सरकार विरोधात आंदोलने केले जाणार असल्याने विरोधाभास निर्माण होत आहे. शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी दुष्काळाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या तयारीत असताना तिकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही थेट मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन सिल्लोडमध्ये दुष्काळ जाहीर करावा म्हणून पत्र देत आघाडी घेतली आहे. सत्ताधारी तिन्ही पक्ष कामाला लागल्यामुळे विरोधकांना मात्र संधीच मिळत नसल्याचेही चित्र आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com