Dr. Pratap Singh Patil 
मराठवाडा

Marathwada Graduate: "परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम होणार"; मविआच्या प्रतापसिंह पाटलांना पहिल्या पसंतीतच निवडून येण्याचा विश्वास

सध्यांकाळपर्यंत मी तुम्हाला पहिल्या फेरीतच विजयी झाल्याचे तुम्हाला दिसेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency Election Result: आम्ही या निवडणुकीत व्हिजन घेऊन उतरलो होतो, विरोधी उमेदवारावर टीका करण्यात वेळ घालवला नाही. सहा वर्षात काय करणार? याचे व्हिजन घेऊन पदवीधरांच्यासमोर गेलो होता. त्यामुळे २३ तारखेला पदवीधरांनी उत्साहात मतदान केले. आमचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे परफेक्ट नियोजन होते, या जोरावर आम्ही विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार. सध्यांकाळपर्यंत मी तुम्हाला पहिल्या फेरीतच विजयी झाल्याचे तुम्हाला दिसेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी व्यक्त केला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरू झाली. महायुतीचे सतीश चव्हाण विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. आज मतमोजणी केंद्रावर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना विजयाचा दावा केला.

मराठवाडा पदवीधरच्या मतदारांची ताकद, लोकशाहीवर निष्ठा, विचार करून पदवीधरांनी मतदान केले आहे. महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने निवडणुकीत उतरली होती. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली हे आपण पाहिले. आम्ही व्हिजन घेऊन उतरलो होतो, संधी मिळाल्यानंतर सहा वर्षात काय करणार हे आमच्या जाहीरनाम्यात सांगितले होते. विरोधपक्षावर आम्ही कुठेही टीका केली नव्हती.

प्रत्येक जिल्ह्याचे व्हिजन मांडले होते, ते पदवीधरांना पटले. सगळ्या लोकांना उमेदवार म्हणून मी आवडलो म्हणून मला सगळ्यांनी मतदान केले. पदवीधरांनी लोकशाहीवर विश्वास ठेवला, त्याची ताकद आतापर्यंत गृहित धरली गेली होती. ती २३ तारखेच्या मतदानातून मोडीत निघाली आहे, असा दावाही पाटील यांनी केला. अठरा वर्षात काय केले? हा मतदारांनी विद्यमान आमदारांना विचारलेला प्रश्न आणि नव्या उमेदवाराकडूनच्या अपेक्षा या मुद्यावर ही निवडणूक लढली गेली.

७६ तालुके, ८ जिल्हे आम्ही कमीत कमी वेळात फिरलो आणि सहा वर्षात आम्ही काय करणार? हे सांगितले. लोकशाहीवर निष्ठा ठेवून पदवीधरांनी मतदान केले आहे. उमेदवार आवडला म्हणून सगळ्यांनीच मला मतदान केले. पदवीधरांना गृहीत धरण्याची परंपरा या निवडणुकीत मोडीत निघालेली तुम्हाला दिसेल. परफेक्ट नियोजनातून आम्ही विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, याचा पुनरुच्चारही पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT