Microsoft Layoffs : AI चा खर्च वाढला! 60,000 कर्मचाऱ्यांना नारळ; मायक्रोसॉफ्टचा युएसए, युकेसह भारतालाही तडाखा

Microsoft Layoffs : आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (AI) अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आता जगभरातील बड्या टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला लागल्या आहेत. पण एआय हे रोजगारक्षम होण्याऐवजी त्यामुळं अनेकांच्या नोकऱ्यांवर गडांतर यायला लागलं आहे.
Microsoft Layoffs :
Microsoft Layoffs :Microsoft Layoffs :
Published on: 
Updated on: 

Microsoft Layoffs : आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (AI) अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आता जगभरातील बड्या टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला लागल्या आहेत. पण त्याचा सर्वात मोठा फटका रोजगाराला बसायला सुरुवात झाली आहे. एआय हे रोजगारक्षम होण्याऐवजी त्यामुळं अनेकांच्या नोकऱ्यांवर गडांतर यायला लागलं आहे. कारण ताज्या वृत्तानुसार, एआयवरील खर्च वाढल्यानं मायक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनीनं अमेरिका, युके आणि भारतातील त्यांच्या तब्बल ६०,००० कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याची ऑफर दिली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या चीफ पिपल ऑफिसर एमी कोलमन यांनी सोमवारी एक ब्लॉगपोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे स्वेच्छेनं नोकरी सोडण्याची ऑफर कॅनडा, भारत, ब्रिटन आणि अमेरिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली होती. अशा प्रकारे स्वेच्छेन नोकरी सोडण्याची ही ऑफर आमच्यासाठी नवी आहे. आम्ही यामधून शिकणार आहोत, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना गरजेच्या कामावरही आम्ही लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर नवे स्कील शिकणं आणि शक्य असेल तोपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये नव्या संधी शोधत राहू, असंही कोलमन यांनी म्हटलं आहे.

Microsoft Layoffs :
Privacy Act: "शोध पत्रकारिता संपणार"; मोदी सरकारच्या गोपनियता कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान; 21 भारतीय वृत्तपत्रांचा एल्गार

मायक्रोसॉफ्ट कंपनी बुधवारी आपले तिमाही आर्थिक धोरण जाहीर करणार आहे. जूनच्या अखेरपर्यंत कंपनीत सुमारे २,२३,००० पूर्णवेळ कर्मचारी होते. वॉशिंग्टनच्या रेडमंड इथं मायक्रोसॉफ्ट्सच्या शेअर्सनं याच महिन्यात आजवरचा सर्वात मोठा पल्ला गाठला होता. सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे १ टक्क्यांची वाढ झाली. यापूर्वी मे महिन्यात मायक्रोसॉफ्टनं अमेरिकेत सुमारे ८७५० कर्मचाऱ्यांना एकूण अमेरिकनं सुमारे ७ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर देण्याची योजना बनवली. या योजनेचा लाभ म्हणा किंवा फटका बसलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरंतर या कर्मचाऱ्या बाहेर सार्वजनिकरित्या या नोकरी सोडण्याच्या ऑफर बद्दल बोलायला परवानगी नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी ओळख उघड न करण्याच्या अटीवर माध्यमांमध्ये ही माहिती दिली आहे.

जुलै महिन्यात कंपनीनं ४८०० कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. ही संख्या कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या सुमारे २.१ टक्के इतकी होती. अशा प्रकारे कर्मचारी कपातीमुळं मायक्रोसॉफ्टच्या Xbox व्हिडिओ गेम व्यवसायातील मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी बाधित झाले होते.

Microsoft Layoffs :
MLC Election Result: शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणुकीचा आज निकाल; कधी होणार मतमोजणीला सुरुवात? कशी सुरु आहे मतमोजणीची तयारी?

डेटा सेंटर्समध्ये वेगानं गुंतवणूक

आर्टिफिशिअल इंटिलिजन्सला अधिक सक्षम करण्यासाठी डेटा सेंटर्सवर वेगानं गुंतवणूक केली जात आहे. यावर्षी ही गुंतवणूक ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यासाठी मेमरी चिप्स, कॉम्प्युटर प्रोसेसर, अन्य डिव्हाईसेस आणि वीजेच्या किंमती वाढल्या आहेत. अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, याचा परिणाम महागाईवर या वर्षाच्या शेवटापर्यंत राहू शकतो.

मायक्रोसॉफ्ट अनेक वर्षांपासून आपली एआय क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. २०२४ मध्ये कंपनीनं एआय तंत्रज्ञानयुक्त पर्सनल कॉम्प्युटर्सची एक नवी कॅटेगिरी लॉन्च केली होती. या कॉम्प्युटर्समध्ये मायक्रोसॉफ्टचा AI असिस्टंट Copilot ला विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमसोबत जोडण्यात आलं. विंडोजचा वापर जगभरात लोक खूप आधिपासूनच करत आहेत.

यानंतर कंपनीनं ऑक्टोबर २०२५ मध्ये Mico नामक एक नवं AI कॅरेक्टर लॉन्च केलं होतं. हे पात्र कार्टुनच्या चेहऱ्यासारखं दिसंत, त्याचा आकार एखाद्या बुडबुड्यासारखा किंवा आगीच्या ज्वाळेसारखा असतो. Mico ला कंपनीच्या व्हर्च्युअल AI असिस्टंट Copilot च्या एका नव्या रुपात सादर करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com