Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde invalid votes : पदवीधर निवडणुकीत हजारो मते बाद; पंकजा मुंडे, सतीश चव्हाणांनी सांगितले भन्नाट किस्से

Pankaja Munde and Satish Chavan share experiences invalid votes Mahayuti campaign rally Marathwada graduate constituency election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारात बाद मतांचा मुद्दा चर्चेत; पोस्टल मतदानापासून पसंतीक्रमापर्यंतच्या अनुभवांनी मेळाव्यात रंगत आणली.

Pradeep Pendhare

Marathwada Graduate Constituency Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीत रंगत वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून, प्रचारात कोणतीही कमी राहू म्हणून नेत्यांची फौज मैदानात उतरले आहे.

दुष्काळात प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप मंत्री पंकजा मुंडे अन् सतीश चव्हाण यांनी पदवीधरच्या निवडणुकीत मते कशी बाद होतात, याचा किस्सा सांगितला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितमध्ये महायुतीची उमेदवाराचा प्रचाराचा मेळावा झाला. यात भाजप मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), सतीश चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीत मते कशी बाद होतात, याचा किस्सा सांगून हशा पिकवला. या दोघांचा हा अनुभव सुरक्षित उमेदवारांना खोचक टोला होता, अशी चर्चा रंगली आहे.

सतीश चव्हाण यांनी, सुशिक्षित असणाऱ्या पदवीधर मतदारांनी (Voter List) दिलेली तब्बल 25 हजार मते कशी बाद झाली याचा अनुभव सांगितला. तर आपल्याला मिळालेली साडेतीन हजार पोस्टल मतं का बाद झाली याचा किस्सा मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितला.

25 हजार मते बाद झाली, तरी निवडून आलो. निवडून आल्यानंतरही मी फेरमतमोजणीची मागणी केली. माझ्या पसंती क्रमांकासमोर अनेकांनी पेनाने गोल केले होते, तर कोणी एकच भाऊ सतीशभाऊ लिहिले होते. कोणी 'बेस्ट ऑफ लक', लिहिले होते, अशी मला मिळालेली 15 हजार मतं बाद झाली, असे सतीश चव्हाण यांनी सांगितले.

भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना लोकसभेत त्यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाल्याची आठवण सांगितली. पंकजाताई आमच्या नेत्या, पंकजाताई आमचा प्राण आहेत, असे लिहिल्याने पोस्टल मतदानात साडेतीन हजार मते बाद झाल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT