

Ahilyanagar political news : महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेला नीलेश लंके समोरे जाताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे बळ मिळाले होते. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र नीलेश लंके यांनी थोरातांचा हात सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शरद पवार यांच्यानंतर थेट भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर बैठका घेताना दिसत असतानाच, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जरी इच्छा असली तरी आता ती वेळ निघून गेली आहे, असे मोठे विधान नीलेश लंके यांनी केले.
राम शिंदे आणि नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काल शासकीय विश्राम नाराजांबरोबर बैठक झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोघांमध्ये बरीच खलबतं झाली. जवळपास निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी या दोघांकडून झाल्याचे दिसते. तरी बिनविरोधासाठी राम शिंदेंनी प्रस्ताव आल्यास सकारात्मक प्रतिसाद देणार असल्याची भूमिका घेतली आहे. अर्ज माघारीला चार दिवस उरले आहे. या कालावधीत सहकाराच्या पुलाखालून बरचं पाणी जाण्याची शक्यता आहे. परंतु नीलेश लंकेंनी जिल्हा बँकेसाठी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेत आली आहे.
नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेसाठी (DCC Bank) तिसरा पर्याय देण्याची जवळपास निश्चित केल्याचे दिसते आहे. स्वतंत्र पॅनलच्या हालचाली सुरू असल्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी 'थांबा आणि पाहा', असे सूचकसे सांगितले. पॅनल निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करणे आवश्यक आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जरी इच्छा असली तरी आता ती वेळ निघून गेली आहे, असे मोठे विधान नीलेश लंके यांनी केले आहे.
नीलेश लंके म्हणाले, "आम्हाला बँकेची चिंता आहे. त्यामुळे बँकेच्या हितानेच आम्ही निर्णय घेणार आहोत. शेतकऱ्यांची कामधेनु टिकली पाहिजे. बँकेच्या हिताच्या दृष्टीने कसे पुढे जायचे, याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. बँक निवडणूक बिनविरोध व्हावी, विश्वासात घेणे हा भाग संपला आहे. आता पुढे कसे जायचे यावर आम्ही काम करत आहोत."
राम शिंदे यांच्याबरोबर बंद दाराआड झालेल्या चर्चेत, नीलेश लंके यांच्यासह एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार भानुदास मुरकुटे देखील होते. या बैठकीत माजी खासदार सदाशिव लोखंडे येणार होते. परंतु ते पोहोचले नाही. याशिवाय शरद पवार राष्ट्रवादीचे बाळासाहेब हराळ, जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, काँग्रेसचे प्रताप शेळके, संपत म्हस्के आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.