Marathwada Mlc Election Results 2026 sarkarnama
मराठवाडा

Marathwada Mlc Results : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दणका! मराठवाड्यात प्रतापसिंह पाटलांची आघाडी, सतीश चव्हाण पराभवाच्या छायेत! तिसऱ्या फेरीनंतरही...

Pratapsinh Patil Vs vs Satish Chavan : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 73 हजार 931 मते मिळाली आहेत. त्यांनी 13 हजारांची आघाडी घेतली आहे.

Roshan More

Pratapsinh Patil News : पुणे पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित झाला आहे. त्यातच आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पदवीधर मतदारंसघातून देखील त्यांना गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पसंतीची मतमोजणीमध्ये कोटा निश्चित झाला असून दोन फेऱ्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत.

दुसऱ्या पसंतीची मतमोजणीत विजयी मतांचा कोटा 88 हजार 558 निश्चित करण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 73 हजार 931 मते मिळाली आहेत. तर, महायुतीचे उमदेवार सतीश चव्हाण यांना 60 हजार 768 मतं आहेत. तर, अपक्ष उमदेवार रविराज साबळे यांना 19 हजार 835 मतं आहेत. सध्यस्थितीत प्रतापसिंह पाटील हे 13 हजार 163 मताने आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीपासून आघाडी

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना 27 हजार 994 मते मिळाली तर, सतीश चव्हाण 20 हजार 116 मते मिळाली होती. तर, दुसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांना 43 हजार 161 तर, प्रतापसिंह पाटील यांना 54 हजार 95 मते मिळाली होती. तरस तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाणांच्या मतांची बेरीच 60 हजार 768 पर्यंत पोहोचली आणि प्रतापसिंह यांना 73 हजार 931 मतं मिळाली आहेत.

प्रतापसिंह पाटील काय म्हणाले?

विजयाच्या दिशेने प्रतापसिंह पाटील आगेकूच करत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ही पदवीधरांनी लोकशाहीवर दाखवलेली निष्ठा आहे. महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढलो. उद्धव ठाकरेसाहेबांची शिवसेना, काँग्रेसने मदत केली. मविआच्या कार्यकर्त्यांनी ग्राऊंड लेव्हला काम केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT