Nagpur MLC Result 2026:सुधाकर कोहळेंची आघाडी, पण विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कौल महत्त्वाचा! नीतेश कराळेंची मते ठरणार निर्णायक?

Nagpur Graduates Constituency Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये ४,२९१ मतांची आघाडी घेतली आहे. मात्र, विजयाचा अंतिम कौल दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
 Nagpur Graduates Constituency Result 2026
Nagpur Graduates Constituency Result 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विजयासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांच्यातील लढतीचा निकाल दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांवर ठरण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये कोहळे यांनी आघाडी मिळवली असली, तरी अंतिम निकालासाठी मतमोजणीतील पुढील टप्पा निर्णायक ठरणार आहे.

पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत सुधाकर कोहळे यांना ४ हजार २९१ मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र, ही आघाडी विजयाची खात्री देणारी ठरत नाही. कारण या निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा ७५ हजार ४३८ इतका आहे. सध्याची परिस्थिती पाहता, कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांवर हा कोटा गाठता येणार नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या पसंतीक्रमात आघाडी मिळवणाऱ्या भाजपच्या सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंतीची किती मते मिळतात, तसेच काँग्रेसचे ॲड. अभिजीत वंजारी यांना या मतांचा किती फायदा होतो, यावर निकालाचे गणित अवलंबून असेल. पहिल्या फेरीतील आघाडी कायम राहते की दुसऱ्या पसंतीक्रमातील मतांमुळे निकालाचे चित्र बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अपक्ष उमेदवार नीतेश कराळे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यांना २४ हजार २४९ मते मिळाली आहेत. त्यामुळे कराळे यांना पहिल्या पसंतीक्रमात मतदान करणाऱ्या मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कल कोणाकडे राहतो, यावर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून असू शकते.

 Nagpur Graduates Constituency Result 2026
UP MLC Election Result: विधानपरिषद निवडणूक निकालात खळबळ! मतदान झाले 623, मतपेटीत मतपत्रिका सापडल्या 675; नेमकं काय घडलं?

विजयाचा निर्धारित कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आला नाही, तर सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालात पहिल्या पसंतीक्रमातील आघाडीपेक्षा दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांचे महत्त्व वाढले आहे. भाजपचे सुधाकर कोहळे आपली आघाडी विजयात रूपांतरित करतात की काँग्रेसचे अभिजीत वंजारी निकालात बाजी मारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आत्तापर्यंतची मतमोजणी

८४ हजार ३ एकूण मत

अवैध - ७ हजार !१२८

वैध - ७६ हजार ८७५

अभिजित वंजारी

१) २८९९८

कोहळे २) - २८०७१

३)कराळे - १४७०८

वंजारी लीड - ९२७

......

८१ हजार मतांची मोजणी

वंजारी - २६,९७०

कोहळे - ३१,८७०

......

कोहळे लीड ४ हजार ८६७

......

यातून ८४ हजार मतांच्या मोजनीतील वंजारी यांची ९२७ मते वगळल्यास ३ हजार ९१० मतांची आघाडी

....

एकूण मत

वंजारी - ५५,९६७

कोहळे - ५९९४०

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com