Suresh Dhas : देशाच्या स्वातंत्र्यानंतर एका वर्षाने मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त, स्वतंत्र झाला. विनाअट महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेतला, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी अनेक आश्वासने दिली. (Monsoon Session News) पण आजही मराठवाड्याला पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागते, उत्तर महाराष्ट्राशी झगडावे लागते, अशी खंत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सावानिमित्त अभिवादनपर प्रस्तावातील चर्चेत धस (Suresh Dhas) यांनी सहभाग घेतला. आष्टी-पाटोदा मतदारसंघातील जनतेचा, स्वातंत्र्य सैनिकांचा मराठवाडा मुक्ती लढ्यातील सहभागावर देखील त्यांनी भाष्य केले. (Marathwada) असब जहा निजाम याची हद्द ७ लाख ४३ हजार चौरस किलोमीटर होती. करोडगिरी नाका सीमेवर असायचा, माझ्या आष्टी तालुक्यात अंबरा इथे हा नाका होता.
या भागातील रस्ते सरळ का? तर कर गोळा करतांना निजामाच्या अधिकाऱ्यांना त्रास होवू नये हा हेतू होता. घोड्यावर बसून सरळ रस्त्याने चालायचे आणि गावाच्या शिवेवर दोन्ही बाजूचे लोक कर आणून द्यायचे. (Monsoon Session) स्वामी रामानंद तीर्थांनी मुक्ती लढ्याची चळवळ सुरू केली. माझ्या मतदारंघातील पाटोदा तालुक्यातील हुतात्मा देवराव आरसूळ यांच्यासह शहीदांची संख्या देखील माझ्या तालुक्यात अधिक आहे. आमच्या भागातील लोक लढवय्ये होते.
निजामाच्या हद्दीतून तडीपार केलेल्या लोकांना भाकरी खावू घालण्याचे काम या भागातून केले जायचे. एमआयएमची स्थापना तेव्हा झाली होती, असा दावा देखील धस यांनी आपल्या भाषणात केला. कासीम रझवी अतिषय घातक होता. ८५ टक्के हिंदूवर त्याकाळात अन्विनत अत्याचार करण्यात आले. मंदिरे वाचवण्यासाठी तेव्हा पांढरा रंग दिला जायचा. एखाद्या गावात मुस्लीमाचे एकच घर असेल तर त्याला बंदूक पुरवली जायची. मशिदीतून हिंदूंविरोधात भडकवले जायचे, तलवारी, बंदूका पुरवल्या जायच्या.
मुलतबक कायद्यामुळे मराठवाड्यातील मंदिरांच्या जमीनीचे प्रश्न अजूनही मिटले नाही. लाखो हेक्टर जमीनीचा गैरवापर त्यामुळे केला जातोय. यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला महाराष्ट्रात सहभागी करुन घेतांना जुने नियम कायम ठेवल्यामुळे आजही हा प्रश्न सतावतोय. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेलांचे आभार मानावे लागतील. पोलिस अॅक्शन करून अवघ्या दिड दिवसात निजामाला त्यांनी शरण आणलं. आमच्या तालुक्यातून पोलिस अॅक्शनला सुरूवात झाली होती.
पाकिस्तानला हा भाग जोडण्याचा प्रयत्न झाला. पण जनता भारताच्या बाजूने होती, असेही धस यांनी सांगितले. पण स्वातंत्र्यानंतर एका वर्षाने विनाअट महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्यावरील अन्याय अजूनही संपलेला नाही. जायकवाडी धरणातील पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष आजही होतो.
पाण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. हा प्रश्न कायमचा निकाली काढला पाहिजे. दिवंगत विलासराव देशमुख यांनी मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. एक-दोन बैठका सोडल्या तर ही प्रथा देखील आता बंद झाली. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी संभाजीनगरात मंत्रीमंडळाची एक बैठक वर्षातून घेण्यात यावी, अशी मागणी देखील धस यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.