Monsoon Session News : देशाच्या स्वातंत्र्य लढ्याइतकेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व..

Marathwada : दिवाकर रावते, गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली.
Monsoon Session News
Monsoon Session News Sarkarnama

Ambadas Danve : निजामाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक शोषणाविरुद्ध २२४ वर्ष लढा देत मुक्त झालेला मराठवाडा आणि त्याच्या लढ्याला देशाच्या स्वतंत्र लढ्याइतकेच महत्व असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितले. मराठवाडा हा लढवय्या, प्रामाणिक असल्याचेही दानवे म्हणाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिवादन प्रस्तावावर ते बोलत होते.

Monsoon Session News
Monsoon Session News : मुंबईत पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती, विधान परिषदेचे कामकाज थांबवले..

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा, रझाकारांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र सैनिकांनी दिलेले बलिदान, पत्करलेले हौतात्म अशा विविध गोष्टींना दानवे यांनी उजाळा दिला. (Monsoon Session) भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही संस्थाने ही स्वतंत्र होती. यामध्ये जुनागड, हैदराबाद व काश्मीर यांचा समावेश होता. (Marathwada) यांचे शासक स्वतंत्रपणे कामे करत होती. तत्कालीन केंद्रीय सरकारने या संस्थानांच्या शासकांना हिंदुस्थानात सामील होण्याची विनंती केली होती परंतु या संस्थांनी त्याला मान्यता दिली नाही.

लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी हिम्मत दाखवून जुनागड संस्थान भारतात सामील करून घेतले परंतु इतरांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. (Maharashtra) त्यामुळे हैदराबाद संस्थान हिंदुस्तान मध्ये सामील करण्यासाठी पोलीस ॲक्शन करण्यात आली. माझे दोन्हीकडील आजी-आजोबा या मुक्तिसंग्रामामध्ये सामील होते. शिवसेना नेते दिवाकर रावते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली.

तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यास मान्यता दिली. या संघर्षमय इतिहासापासून नवीन पिढी पासून अलिप्त आहे, त्यांच्यासमोर हा इतिहास येणे गरजेचे असल्याचे दानवे म्हणाले. तत्कालीन निजामाच्या कार्यकाळामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त सहा हायस्कूल होत्या त्यानंतर काही खाजगी शाळा सुरू झाल्या. संभाजीनगर हे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे महत्वाचे केंद्र होते. याच शहरातील गुलमंडीवर स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या लोकांना शस्त्र टाकायला लावली होती.

निजामाच्या काळामध्ये कोणत्या विपरीत परिस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांनी हा लढा लढला हे जगासमोर येणे गरजेचे आहे. निजामांच्या अन्यायाविरोधात प्रत्येक गावातून एक स्वातंत्र्यसैनिक उभा राहिला. गोविंद भाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ हे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आर्य समाजाचे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान स्वातंत्र्य लढ्यात होते. मुक्ती संग्राम लढा सुरू असताना उमरी येथे स्वातंत्र्यसैनिकांनी बँक लुटली.

Monsoon Session News
BJP District President News: ठाकूर सक्रिय झाल्याने चालुक्य यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..

हा लढा इतका प्रमाणिक होता की या लुटीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब आजही उपलब्ध आहे. यातून स्वातंत्र्य सैनिकांचे लढ्या प्रती असलेले समर्पण दिसून येते. २० लाख ६३ हजार १५ आणे अशी ही रक्कम होती. परंतु यातील एक रुपया सुद्धा कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतःसाठी खर्च केला नाही. कर्नाटकातील गुलबर्गा आणि विदर्भातील बुलढाणा व वाशिम हे जिल्हे सुद्धा तत्कालीन निजामाच्या कार्यकाळात मराठवाड्यामध्ये सहभागी होते. परंतु इंग्रजांनी हळूहळू निजामांकडून हा प्रदेश बळकावला.

मराठे आणि निजामामध्ये अनेक लढाया झाल्या. संभाजीनगरातील वैजापूर येथील पानखेड येथे पेशवे आणि निजामांमध्ये लढाई झाली. ज्यामध्ये पेशवे यांनी निजामाच्या सैनिकांना धडा शिकवला याची आठवण देखील दानवे यांनी आपल्या भाषणातून करून दिली. बहुसंख्य हिंदू असलेल्या मराठवाड्यात इस्लामिक पद्धतीचे शिक्षण आणि राज्य सुरू होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नंतरही इथे तिरंगा फडकवू दिला जात नव्हता. तेव्हा ५५० गावांनी तिरंगा झेंडा फडकवून कायदा भंग केला होता. अनेक तरुणांनी सरकारी नोकऱ्यांचे राजीनामे दिले, वकिलांन आपली वकील सोडली.

Monsoon Session News
BJP District President News : भाजपची नवी खेळी ; बोराळकर कायम, ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्ष..

अनेकांनी स्वातंत्र्याच्या हेतूने गोदाम लुटली. ८४४ निजामांच्या सैनिकांना स्वातंत्र्यसैनिकांनी यमसदनी धाडले. हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहिले तर ही भारताची विभाजनाची सुरुवात असेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. निजाम हा अनुसूचित जातीतील समाजाचा शत्रू आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आंदोलना दरम्यान वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती. त्याची आठवण म्हणून संभाजीनगर येथे वंदे मातरम सभागृह बांधण्यासाठी १९८२ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु २०२२ मध्ये ते पुर्ण झाल्याचे दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com