Beed Assembly election Sarkarnama
मराठवाडा

Beed Assembly Election : आमच्याकडे शिवरायांचा विचार; कटेंगे, बटेंगे चालणार नाही : अजित पवार

Beed Assembly Election : आचारसंहिता संपताच बीडचा पाणीप्रश्न सोडविणार असून बिंदुसरा पुल कम बंधाऱ्याचाही प्रश्न सोडविणार

सरकारनामा ब्यूरो

Beed Assembly Election : आम्ही शिवरायांचा विचार घेऊन चालणारे आहोत, इथे बटेंगे कटेंगे असले चालणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहोत. तुम्ही महायुतीवर विश्वास ठेवा, कोणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, मुस्लिम समाज व सर्व जाती धर्माच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. 13) श्री. पवार यांची सभा झाली.  कृषीमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार डॉ. क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, राजेश्‍वर चव्हाण, कल्याण आखाडे, पप्पू कागदे, सर्जेराव तांदळे, डॉ. सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, आम्ही फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात आहोत, त्यात अंतर पडणार नाही. मधल्या काळात आपण सरकारमध्ये जावे अशी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची इच्छा होती.

कारण त्याशिवाय विकास कसा करणार? आपल्या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. आचारसंहिता संपताच बीडचा पाणीप्रश्न सोडविणार असून बिंदुसरा पुल कम बंधाऱ्याचाही प्रश्न सोडविण्याचा शब्द यावेळी पवारांनी दिला.

अधिवेशनाचा उपयोग तोडपाणीसाठी करुन त्या भागाचा विकास होत नसतो असा, टोलाही अजित पवारांनी लगावला. यावेळी धनंजय मुंडे, पप्पू कागदे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविकात डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले.

माजी आमदार जनार्दन तुपे, सय्यद नविदुज्जमा, गंगाधर घुमरे, बबनराव गवते, अमर नाईकवाडे, मोईन मास्टर, फारुक पटेल, सुभाष क्षीरसागर, बप्पासाहेब घुगे, मुन्ना फड, अशोक हिंगे, सयाजी शिंदे, उमेश आंधळे यांची उपस्थिती होती.

भूमिका मांडण्यास जरांगे पाटील सक्षम

सभेनंतर पत्रकारांनी पवार यांना पवार व जयंत पाटलांच्या सभेत लोक आरक्षण व जरांगे पाटील यांच्याबाबत बोलत आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर मनोज जरांगे पाटील स्वत:ची भूमिका घ्यायला सक्षम आहेत. त्यांनी निवडणुकीबाबतही भूमिका मांडली होती. सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आहे. या भागात निजामशाही असल्याने कुणबी नोंदी आढळल्याने ओबीसीतून आरक्षणाचा फायदा झाला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर लाखो कुणबी नोंदी व प्रमाणपत्र मिळाल्याचे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT