Devendra Fadnavis-Abhimanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

Abhimanyu Pawar : घरातला वाढपी...आता मिळणार झुकते माप; देवाभाऊंच्या 'पुन्हा' येण्याने औशाला जास्त फायदा होणार!

Abhimanyu Pawar Wins Second Time From Ausa Assembly Election: मतदारांच्या या विश्वासाला सार्थ करीत पवारांनी औशाचा चेहरा मोहरा बदलला. चारशे कोटींच्या आसपास निधी आणून औशाला विकासाच्या वरच्या पंक्तीत बसवले.

Mangesh Mahale

जलील पठाण

Ausa News: देवेंद्र फडणवीसांचे लाडके शिष्य अभिमन्यू पवार यांनी दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला. अभिमन्यू पवारांना मंत्रिपदाचा मान मिळो की न मिळो मुख्यमंत्री पदावर घरचा वाढपी असल्याने औशाच्या ताटात आता भरभरून मिळणार याची खात्री पवारांसह मतदारसंघातील लोकांना वाटत आहे.

औशाची खडानखडा माहिती असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. औशासाठी काय अधिक चांगले याची जाण फडणवीसांना असल्याने ते औशाच्या विकासाला काहीच कमी पडू देणार नाहीत.

आमदार अभिमन्यू पवारांना आता घरचा वाढपी मिळाला असल्याने औशाच्या ताटात आता भरभरून मिळणार आणि अभिमन्यू पवारांच्या स्वप्नांना देवेंद्र फडणवीस बळ देणार यात शंका नाही.

महायुतीला मतदारांनी 'न भूतो न भविष्यते' असे यश दिले. मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती. ही उत्सुकता गुरुवारी झालेल्या शपथविधीने अखेर संपवली. मुख्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदामुळे राज्याला एक वेगळी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री बनण्याने औशाला नक्की जास्त फायदा होणार हे निश्चित मानले जात आहे.

अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न

राज्यात देवेंद्र आणि औशात अभिमन्यू हे समीकरण येणाऱ्या पाच वर्षात ऐतिहासिक कामगिरी करणार हे नक्की. त्याला कारणही तसेच आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्या लाडक्याला फडणवीसानी कांही कमी पडू दिले नाही. आता तर ते स्वतः प्रमुख पदावर असल्याने औसेकरांची झोळी तुडुंब भरणार यात शंका नाही.

औसा मतदारसंघात विकासाची चळवळ खरी सुरू केली ती २००९ मध्ये तत्कालीन आमदार बसवराज पाटलांनी. सुमारे एक दशक त्यांनी औसा मतदारसंघात अनेक विकासकामे करून या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला.

विकास हाच मुद्दा

२०१९ च्या निवडणुकीत बलाढ्य बसवराज पाटलांचा नवख्या अभिमन्यू पवारांनी पराभव करीत औशाच्या यादीत आमदार म्हणून आपले नाव कोरले. बसवराज पाटलांच्या पराभवात आणि अभिमन्यू पवारांचा विजयात मतदारांच्या मनात विकास हाच मुद्दा प्रामुख्याने होता. बसवराज पटलांपेक्षा पवार जास्त विकास करतील याची खात्री मतदारांना होती.

मतदारांच्या या विश्वासाला सार्थ करीत पवारांनी औशाचा चेहरा मोहरा बदलला. चारशे कोटींच्या आसपास निधी आणून औशाला विकासाच्या वरच्या पंक्तीत बसविले. यामध्ये अर्थात देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिमन्यू पवारांवर असलेला जीव कारणीभूत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT