
Kolhapur News: राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विक्रमी मताने निवडून आलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जनतेला आपेक्षा आहे. त्याला कारण ही तसेच आहे, दोन महिन्यापूर्वी धामणी धरण प्रकल्प आणि गारगोटीत झालेल्या विराट सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'तुम्ही आमदार करा मी अबिटकरांना नामदार करून तुमच्याकडे पाठवतो' या दिलेल्या शब्दामुळे येथील मतदारांया आशा पल्लवीत झाल्या आहेत.शिंदे आपला शब्द पाळणार काय याकडे लक्ष लागले आहे.
सलग तिसऱ्या वेळेला निवडून आलेल्या प्रकाश आबिटकर यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दिला होता. बंडाचा ठपका डोक्यावर घेऊन त्यांनी मतदारसंघासाठी हजारो कोटींची कामे ओढून आणली. तेव्हाच त्यांना मंत्रीपद मिळेल ही अपेक्षा होती. मात्र त्यांनीही नम्रपणे नाकारून माझ्या मतदारसंघासाठी अधिक अधिक निधी द्या असे वचन घेतले त्याचा मतदारसंघाला फायदा झाला.
बरीच वर्षे रेंगाळलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळ भरण्याच्या कार्यक्रमाला भर पावसात एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. सर गारगोटीतही त्यांची सभा झाली. यावेळी हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सभेत आबिटकर यांना उद्देशून बोलताना शिंदे यांनी ''माझ्या सोबत असलेल्या सर्वात लाडक्या आमदारांमध्ये आबिटकर यांचा समावेश होतो.
अतिशय कामाचा माणूस माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आलेत तेव्हा विकास कामे आणि मतदारसंघाचे प्रश्न घेऊनच आलेत . त्यामुळे तुम्ही आता पुन्हा त्यांना आमदार करा मी त्यांना नामदार करूनच मतदारसंघात पाठवतो हे माझे वचन आहे " असा शब्द त्यांनी दिला होता. यानंतर लगेचच तासाभरात गारगोटी येथे झालेल्या सभेमध्ये ही त्यांनी याचा पुनरुचार केला होता .
विधानसभा निवडणुकीत आबिटकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत . शिवाय राज्यांमध्ये महायुतीची सत्ताही आली आहे .शिंदे मतदारांना दिलेला शब्द पाळणार काय याकडे लक्ष लागले आहे. आबिटकर यांनी हॅट्रिक केली आहेच आता त्याचा मंत्रिपदावर दावा आहे . त्यांनाही संधी मिळेल काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधील महायुतीच्या दहापैकी दहा जागा निवडून आल्या आहेत. मंत्रिपदामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे सर्वाधिक तीन आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत, तर जनसुराज पक्षाचे दोन आमदार आहेत.
राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला होता. चंदगडमध्ये निवडून आलेल्या अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधून भाजप आणि शिंदे गटाकडून कोणाला मंत्रीपदाची संधी दिली जाणार याीच उत्सुकता सर्वाधिक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.