Mla Udaysingh Rajput With Harshvardhan, Adityavardahn News
Mla Udaysingh Rajput With Harshvardhan, Adityavardahn News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Politics : आजी-माजी अन् भावी आमदार एकत्र ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) आणि ज्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते किंवा तसा दावा केला जातो ते आदित्यवर्धन जाधव विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात एकत्र दिसले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह राजपूत यांनी हर्षवर्धन जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.

तर मतदारसंघातील लोकांची चूक झाली, त्यांनी चुकीचा आमदार निवडून दिला, तो तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही, साध तहसिलदाराला बोलू शकत नाही, (Kannad) अशी टीका करत पुन्हा विधानसभेसाठी दंड थोपटून मैदानात उतरलेले हर्षवर्धन जाधव शुक्रवारी विधानभवनात आले होते. (Udaysingh Rajput) यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आदित्यवर्धन हे देखील होते.

याचवेळी विधीमंडळ परिसरात हे दोघे बाप-लेक उदयसिंह राजपूत यांच्या समोर आले. तेव्हा आमदार राजपूत यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या दोघांना सोबत घेत प्रसार माध्यमांना छायाचित्र काढण्याची संधी उपलब्ध करून दिली. उदयसिंह राजपूत हे शिंदे यांच्या बंडानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या शिवाय मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून राजपूत हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानले जाते.

तर दुसरीकडे सातत्याने चर्चेत राहणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उदयसिंह राजपूत यांची निवडण कशी चूकली हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे. मी आमदार असतो तर असं सांगत ते भाषणातून आता पुन्हा चूक करू नका असे आवाहन मतदारांना करतांना दिसत आहेत. शिवाय एका व्हिडिओमध्ये आता आपल्याला राजकारणात काही नको, पण २०२९ मध्ये जाधव कुटुंब आदित्यवर्धनच्या रुपाने तुम्हाला तुमच्या मनातला आमदार देईन असे सांगत मुलाला देखील राजकारणात उतरवणार असल्याचे सांगून टाकले होते.

तर असे हे जाधव पिता-पुत्र विधीमंडळ परिसरात शुक्रवारी होते. नुकत्याच जाहीर झालेल्या तुटीच्या अर्थसंकल्पावर टीका करत हर्षवर्धन जाधव यांनी राज्यभरात सरकारी जमीनी कुठलेही भाडे न आकारता धनदांडग्याच्या घशात कशा घालण्यात आल्या आहेत याची काही उदाहरण प्रसार माध्यमांच्या समोर ठेवली. त्या संदर्भातील कागदपत्र आपण विधीमंडळ सचिवांकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निमित्ताने विधानभवनात आलेल्या हर्षवर्धन आणि आदित्यवर्धन या पिता-पुत्रांची जेव्हा आमदार उदयसिंह राजपूत यांच्याशी समोरासमोर भेट झाली, तेव्हा दोघांनीही एकमेकांचे हसत स्वागत केले. एवढेच नाही तर प्रसार माध्यमांना एकत्रित फोटो देखील दिला. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT