Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याती गंगापूर येथील ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार होते. (Marathwada Sahitya Sammelan News) परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आणि उद्घाटनाची संधी आमदार प्रकाश सोळंके यांना मिळाली.
राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या कर्जत येथील अधिवेशनात झालेल्या विविध गौप्यस्फोटांमध्ये प्रकाश सोळंके यांना देण्यात आलेल्या कार्याध्यक्षपदाचा उल्लेखही झाला होता. राज्यभरात कर्जतच्या अधिवेशनाची जोरदार चर्चा सुरू असताना अजित पवार यांच्या गंगापूर दौऱ्याला मराठा आरक्षण आंदोलकांनी विरोध दर्शवला होता.
मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी आहे, अजित पवारांनी साहित्य संमेलनाला येऊ नये, असे निवेदन आंदोलकांनी तहसीलदारांना दिले होते. (NCP) त्यानंतर आज अचानक अजित पवार यांचा नियोजित गंगापूर दौरा रद्द करण्यात आला. (Marathwada Sahitya Sammelan) त्यामुळे मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर दौरा रद्द झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, ऐनवेळी अजित पवार ज्या हेलिकाॅप्टरने येणार होते, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि हा दौरा रद्द झाला. अजित पवार येणार म्हणून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा साहित्य संमेलनाचे मुख्य उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. विशेष म्हणजे पवार दिवसभर शहरात थांबून साहित्य संमेलनासह जिल्ह्याची आढावा बैठक, पत्रकार परिषद घेणार होते.
परंतु त्यांचा नियोजित दौरा रद्द झाल्यामुळे साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. गंगापूर शहरातील मुक्तानंद महाविद्यालयात ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
ज्येष्ठ लेखक जगदीश कदम, स्वागताध्यक्ष, माजी आमदार अँड. लक्ष्मणराव मनाळ होते. मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते, आमदार विक्रम काळे, लेखक फ. मू. शिंदे, भरत ससाने, लक्ष्मीकांत देशमुख, ऋषिकेश कांबळे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, अजित पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.