Sanjay Raut On Ajit Pawar : ‘भाजपमध्ये जायला सांगितले होते, तर अजित पवार परत का आले’

Maharasahtra Politics on CM Eknath Shinde & Ajit Pawar-संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्या बदनामीसाठी भाजपची स्क्रिप्ट वाचतात!
Sanjay Raut & Ajit Pawar
Sanjay Raut & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने जे घडवून आणले, त्याबाबत जनतेतून ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याने भाजप आतून खूप अस्वस्थ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही भाजपच्या स्क्रीप्टनुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी खोटे आरोप करण्यात व्यस्त आहेत. (Shivsena Leader Sanjay Raut said, CM Shinde & Ajit Pawar both are works as BJP`s direction)

शिवसेना (Shivsena) नेते राऊत (Sanjay Raut) न्यायालयीन सुनावणीसाठी नाशिकला (Nashik) आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) उद्या (ता. ३) पाच राज्यांचा जो निकाल जाहीर होईल, त्यातून मोठा राजकीय धक्का बसेल असा दावा केला.

Sanjay Raut & Ajit Pawar
Maharashtra Politics : न्यायालयीन सुनावणीआधी राऊत म्हणाले, ‘होय दादा भुसे भ्रष्ट मंत्री आहेत’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानांविषयी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही जी भाषा बोलतात ती त्यांची नव्हे तर भाजपची स्क्रिप्ट आहे. त्यांचा एकमेव हेतू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे चारित्र्यहनन करणे एवढेच असते.

ते म्हणाले, भाजपचे सध्याची कामकाजाची पद्धत आणि केलेले आरोप अक्षरशः कपोलकल्पित व खोटे असतात. त्यांची सध्याची पद्धत म्हणजे दहशतवादी संघटना अल् कायदासारखी असते. भाजपने महाराष्ट्रात अन्य पक्ष आणि नेत्यांचे घरे फोडली, तरीही त्यातील नेते तुटत नाहीत म्हणून नेत्यांच्या चारित्र्यावर हल्ला केला जातो आहे. उपमुख्यमंत्री पवार आणि मिंधे गटाने त्यांचा हा मार्ग निवडला आहे. त्यांनी त्यामार्गाने हवे तसे जावे. उपमुख्यमंत्री पवार बोलत नसतात, तर भाजप त्यांच्या मुखातून बोलतंय.

महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. त्यामुळेच भाजप त्यांना संपविण्याचे राजकीय कारस्थान करीत आहे. मात्र, भविष्यात महाराष्ट्र आणि देशात आमचेच सरकार येईल.

गेल्या काही दिवसांत काश्मीर आणि इस्राईलमधील बॉम्ब हल्ले आम्ही पाहिले असल्याचे सांगून राऊत म्हणाले, भाजपदेखील तसेच खोटे आरोप करीत असल्याचे आम्ही पाहतो आहे. हा पक्ष काही फुटीर लोकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर खोटे हल्ले करीत आहे. अजित पवार दावा करतात, तसे शरद पवार यांनी भाजपत जा असे सांगितले होते, तर मग तुम्ही परत का आलात, असा प्रश्न राऊत केला.

Sanjay Raut & Ajit Pawar
Congress Vs BRS : तेलंगणात आतापासूनच फोडाफोडीचे राजकारण सुरू; कोण कुणाच्या संपर्कात ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com