Minister Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : सत्तारांनी पाॅवर दाखवली, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन थेट सिल्लोडमध्ये..

Agriculture Exhibition : सिल्लोड सारख्या छोट्या शहरात राज्यभरातील कृषीतज्ज्ञ, संशोधक येवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार.

सरकारनामा ब्युरो

Abdul Sattar News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार जितके वादग्रस्त तितकेच हट्टी आणि आपल्याला हवं तेच घडवून आणणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. Farmers राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा शासकीय कृषी महोत्सवाचे आयोजन आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रात केले जायचे. Marathwada पण शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्री होताच अब्दुल सत्तार यांनी ही मक्तेदारी मोडीत काढत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन थेट आपल्या सिल्लोड मतदारसंघातच भरवण्याचा निर्णय घेतला.

अर्थात यासाठी त्यांना आपली शक्तीपणाला लावावी लागली असणार हे वेगळे सागांयला नको. पण एकदा ठरवलं की ते करून दाखवणारचं असा काहीसा सत्तारांचा खाक्या राहिला आहे. येत्या १ ते ५ जानेवारी पर्यंत सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यासाठी सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रशासनासह आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देखील कामाला लावले आहे. (Marathwada) जाहीर सभा, रोडशो असो की मेळावा तो यशस्वी कसा करायचा हे सत्तार यांना चांगलेच माहित आहे.

त्यामुळे पहिल्यादांच मराठवाड्यात आणि त्यात आपल्या मतदारसंघात होणारा कृषी महोत्सव सत्तार हटके करणार यात शंका नाही. आपले लाडके सुनील चव्हाण यांना सत्तारांनी दीड महिन्यातच कृषी खात्याच्या आयुक्तपदी आणले. त्यानंतर या जोडगळीचा कृषी महोत्सव हा पहिलाच उपक्रम असणार आहे.

या निमित्ताने सिल्लोड सारख्या छोट्या शहरात राज्यभरातील कृषीतज्ज्ञ, संशोधक येवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध विषयांवरील परिसंवाद, व्याख्यानांसह तब्बल ६०० स्टाॅल याठिकाणी उभारले जाणार आहेत. शिंदे सरकारमध्ये मंत्री होण्याआधीपासूनच सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात अनेक प्रकल्प खेचून आणले आहेत.

एमआयडीसी, सुतगिरणी, सिचंनाचे प्रकल्प यासह भीमपार्क, शिवस्मारक अशा अनेक प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा निधी देखील सत्तार यांनी पदरात पाडून घेतला आहे. एकीकडे मतदारसंघाचा विकास आणि दुसरीकडे राज्यस्तरावर स्वतःची छाप पाडण्याचा सत्तारांचा हा प्रयत्न यशस्वी होतांना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT