Shivsena : सत्तासंघर्षाची सुनावणी आता थेट नव्या वर्षात ; निर्णय पुन्हा लांबणीवर!

Shivsena : वैधानिकदृष्ट्या हे खूप महत्त्वाचे प्रकरण आहे. तोपर्यंत एखादं सरकार कसं काय काम करू शकतं?
CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News sarkarnama
Published on
Updated on

Shivsena : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावाणी १० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. १० जानेवारीपासून यावर मुख्य सुनावणी पार पडणार असल्याची शक्यता दिसत आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरची सुनावणी आता थेट येणाऱ्या नवीन वर्षात पार पडणार आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात याबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. २९ नोंव्हेंबरला हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर जाणार होते. मात्र घटनापीठातील एक न्यायमूर्ती आजारी असल्याने कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी नव्या तारखांबाबत विचार सुरू होता. यामध्ये ख्रिसमसची सुट्टीचा आले असल्याने सुनावणी जानेवारीत होणार आहे.

CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
Shinde-Fadanvis Politics : नाराज आमदारांची नाराजी दूर होणार: शिंदे-फडणवीसांचा असा आहे नवा प्लॅन?

कालच सुप्रिम कोर्टाने एक आदेश काढत स्पष्ट केले होते की, १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये कोणतंही महत्त्वाचं प्रकरण घटनापीठ ऐकणार नाही. सत्तासंघर्ष प्रकरण आज न्यायालयात मेंशन केलं गेलं. यामध्ये १० जानेवारीची तारीख दोन्ही बाजूच्या वकीलांकडून मुख्य युक्तिवादासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे समजते आहे.

CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
Sanjay Raut : मराठी माणसाला खतम करण्याचा प्रयत्न सुरू ; राऊतांचा अप्रत्यक्ष भाजपवर टिकास्त्र!

एका वकीलाने आक्षेप घेतला की, वैधानिकदृष्ट्या हे खूप महत्त्वाचे प्रकरण आहे. तोपर्यंत एखादं सरकार कसं काय काम करू शकतं? यावर कोर्टाने म्हंटले की, १३ डिसेंबरला हे प्रकरण आम्ही डायरेक्शनसाठी लिस्ट करू.

म्हणजेच फार काही त्या दिवशी घडणार नाही. पुढचं वेळापत्रक ठरवण्यासाठी ही तजवीज असेल. १० जानेवारी या तारखेवर निश्चित करण्यासाठी प्रक्रिया पार पडेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com