Marathwada Teachers Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Consitituency : काळे चौथ्यांदा विक्रम करणार ? की भाजप धक्का देणार..

Election News: मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात अपक्ष विश्वासराव यांनी चांगली मते मिळवल्याचा अंदाज आहे.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ८६ टक्के इतक्या मतदानाची काल नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण एक टक्क्याने कमी असले तरी शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. मुख्य लढत महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) आणि भाजप युतीचे किरण पाटील यांच्यात झाली असली तरी या दोघांच्या विजयाचे गणित अपक्ष आणि इतर उमेदवारांमध्ये मतांची विभागणी कशी होते? यावर ठरणार आहे.

मतदानानंतर समोर आलेल्या माहितीनूसार पहिल्या पसंतीचा कोटा पुर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा काळे-पाटील यांना पुर्ण करणे शक्य होणार नाही. (Mahavikas Aghadi) त्यामुळे गेल्यावेळे प्रमाणे याहीवेळी दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच शिक्षक आमदार ठरण्याची शक्यता आहे. (Bjp) भाजपने किरण पाटील यांच्यासारखा नवखा उमेदवार दिला असला तरी भाजपच्या कामगिरीत यावेळी चांगली सुधारणा झाल्याचे बोलले जाते.

विनाअनुदानित शाळा, टप्पा अनुदान, शिक्षकांचे पगार या मुद्यावर भाजपकडे मतदार यावेळी झुकल्याचे चित्र आहे. शाळा अनुदानासाठी शिंदे-फडणवीस सरकारने साडेअकराशे कोटी रुपयांची केलेली तरतूद, जुन्या पेन्शन योजने संदर्भात बदललेली भूमिका याचा देखील फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चौथ्यांदा निवडणूक लढवत असलेल्या विक्रम काळे यांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रभावी प्रचार यंत्रणा, तीन टर्म शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडल्याचा अनुभव गाठीशी असला तरी त्यांच्याबद्दल शिक्षक मतदारांमध्ये विशेषत विनाअनुदानित शाळांमधील मतदारांची नाराजी असल्याचे उघडपणे समोर आले आहे. परिणामी काळेंसाठी चौथा विक्रमी विजय वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी झाली होती, परंतु हे बंडखोर प्रभावहीन ठरले आहेत. त्यांचा कुठेलही परिणाम जाणवला नाही, ही दोन्ही उमेदवारांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.

वंचित, प्रहार, अपक्ष यांची कामगिरी मर्यादित राहणार आहे. या सगळ्यांमध्ये बाजी मारली ती नांदेडच्या अपक्ष उमेदवार सुर्यकांत संग्राम विश्वासराव यांनी. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात विश्वासराव यांनी चांगली मते मिळवल्याचा अंदाज आहे. मराठवाडा मुख्याध्यापक संघटनेशी संबंधित असलेल्या विश्वासराव यांना. नांदेड, बीड, लातूरसह औरंगाबाद वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी केल्याची चर्चा आहे.

विजयी होण्याइतपत त्यांना मते मिळणार नसले तरी काळे की पाटील? यावर मात्र त्यांना मिळालेल्या मतांचा प्रभाव निश्चित असले, अशी चर्चा आहे. अपक्ष मनोज पाटील हे देखील चर्चेत असणारे नाव, पण ऐन मतदानाच्या आधीच त्यांच्या समर्थकांना फोडण्यात भाजप आणि महाविकास आघाडीला यश आले होते. त्यामुळे मनोज पाटील हे काहीसे मागे पडले. मनोज पाटील, विश्वासराव या दोघांची दुसऱ्या पसंतीची मते कुणाच्या पदरात पडतात? यावर शिक्षक आमदार ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT