Imtiaz Jalil News : शेलारांनी ट्विट केला हिंदू मोर्चाचा फोटो, इम्तियाज म्हणाले हे तर मोठे कारस्थान..

Maharashtra : एमआयएमने प्रतिक्रिया देत हे मोर्चे म्हणजे मोठे नापाक कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
Imtiaz Jalil News, Aurangabad
Imtiaz Jalil News, Aurangabad Sarkarnama
Published on
Updated on

Aimim : लव्ह जिहाद आणि लॅन्ड जिहादच्या विरोधात नुकताच मुंबईत हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चावरून राजकाणर सुरू असतांनाच त्यात एमआयएमने देखील उडी घेतली आहे. भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार (Ahish Shelar) यांनी मुंबईत निघालेल्या जन आक्रोश मोर्चा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यावर रिट्वीट करतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

Imtiaz Jalil News, Aurangabad
30-30 Scam News : राठोडला मोबाईलवरून नातेवाईकाशी बोलणे महागात पडले, चौकशी सुरू...

महाराष्ट्रात काढण्यात येणाऱ्या या विराट मोर्चा मागे मोठे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. `महाराष्ट्रातील या सर्व मोठ्या मोर्चांमागे काहीतरी नापाक कारस्थान असल्याचे दिसते`, अशा शब्दात त्यांनी जन आक्रोश मोर्चावर भाष्य केले. (Aimim) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीने लव्ह जिहादच्या विरोधात मुंबईत काढण्यात आलेला जन आक्रोश मोर्चा म्हणजे (Bjp) भाजपचा मोर्चा असल्याची टीका केली होती.

देशावर आठ वर्षांपासून हिंदू असलेल्या शक्तिमान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राज्य आहे. महाराष्ट्रातही हिंदू म्हणवणाऱ्यांचं सरकार आहे. असं असतानाही मुंबईत हिंदुंचा आक्रोश मोर्चा निघतो? हे दुर्दैवी आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर पटलवार केला होता. विशेष म्हणजे या मोर्चात भाजपचे आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आदी नेते सहभागी होते.

हा मोर्चा शिवसेना भवनसमोरून मार्गस्थ झाला. त्यावेळी भाजप नेत्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात टीका केली होती. मोर्चावरून शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना आता आशिष शेलारांच्या ट्विटवर एमआयएमने प्रतिक्रिया देत हे मोर्चे म्हणजे मोठे नापाक कारस्थान असल्याचे म्हटले आहे. आता भाजपकडून एमआयएमच्या आरोपावर काय उत्तर दिले जाते हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com