Massajog By Election : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या मस्साजोग गावच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत त्यांची पत्नी अश्विनी देशमुख या सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत.
मात्र, सुरूवातीला ही पोटनिवडणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण पाच जणांनी अर्ज भरल्यामुळे बिनविरोधची चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचपैकी तिघांनी माघार घेतली. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला.
त्यामुळे आता अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मात्र, स्वरूपानंद देशमुख हे कुणाच्यातरी म्हणण्यावरून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप करण्यात आला होता. याच आरोपांवर आता स्वरूपानंद देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अश्विनी देशमुख यांना निवडणुकीसाठी दबाव टाकणारे त्यांच्या कुटुंबातील लोक आहेत. सर्वात जास्त दबाव त्यांच्यावर त्यांच्या दिराचा (धनंजय देशमुख) असून त्यांनीच त्यांना प्रोत्साहित केलं आहे, असं स्वरूपानंद देशमुख यांनी केलं. शिवाय यावेळी त्यांनी नाव न घेता धनंजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला.
काही लोकांची महत्त्वकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच माझ्यावर आरोप करणाऱ्याने समोर यावं आणि त्यांना जर मला कोणी तरी उभं केलं किंवा मी कोणाच्यातरी सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे जाणवलं तर मी सर्व गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार आहे, असंही स्वरूपानंद देशमुख म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी गावकऱ्यांनी मला साडेतीन वर्ष मला काम करण्याची संधी दिली होती. पुढील 18 महिन्यात मी संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली वाहणार आहे. गावकऱ्यांनी संधी दिली तर सरपंच देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार असंही ते यावेळी म्हणाले.
तर मस्साजोगच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, या निवडणुकीत मस्साजोगमधील जनता सरपंचपदी कोणाला निवडणार? याकडे अवघ्या राज्यातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.