Baramati By Election : सुनेच्या प्रचाराच्या सांगता सभेत शरद पवार उपस्थित राहणार की नाही? सुनेत्रा पवारांसह सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट...

Baramati By Election Sunetra Pawar Campaign Rally: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.
Supriya Sule statement on Baramati by election
Supriya Sule statement on Baramati by electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 Apr : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज सांगता सभा पार पडणार आहे. दुपारी २ वाजता बारामती मधील शारदा प्रांगणामध्ये ही सभा पार पडणार असून सुनेत्रा पवार यांनी सकाळी सभा स्थळाची पाहणी केली.

या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

सांगता सभेच्या ठिकाणी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारे फोटो लावण्यात आले आहेत. याबाबत विचारलं असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांच्या आठवणी या बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत. लोकांच्या भावनांमधून दिसून येतात."

Supriya Sule statement on Baramati by election
Pritam Lodhi Controversy : मुलाने भरधाव 'थार'ने 5 जणांना उडवलं, भाजप आमदाराने चौकशी करणाऱ्या पोलिसांचाच बाप काढला; म्हणाले, "तुमच्या..."

तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत का ? याबाबत विचारला असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, सांगता सभेला खासदार सुप्रिया सुळे या येणार आहेत. त्यांच्यासोबतच पवार कुटुंबातील इतर ही मंडळी उपस्थित राहणार आहेत.

मात्र शरद पवार यांची प्रकृती सध्या बरी नाही असं कळत आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याबाबत अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील माहिती दिली असून सुप्रिया सुळे म्हणाल्या, सांगता सभेला उपस्थित राहण्याबाबत सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता.

Supriya Sule statement on Baramati by election
Ashok Kharat Scam : भोंदू खरातचं आणखी एक मोठं कांड उघडकीस; पोलिसांसह सर्वांनाच बसला धक्का

कुटुंब म्हणून तुम्ही सभेला उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून मी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

त्यामुळे या सभेला उपस्थित राहणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. तसंच शरद पवार हे सध्या मुंबईमधील ब्रिज कांडी रुग्णालयात काही टेस्ट करत आहेत. त्यामुळे त्या टेस्ट झाल्यानंतरच शरद पवारांच्या उपस्थितीबाबत स्पष्टता येईल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com