Massajjog Sarpanch News Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed News : राज्यभरात गाजत असलेल्या मस्साजोगच्या सरपंचांचा दिल्लीत असाही सन्मान! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण..

Massajog village sarpanch receives special honor in Delhi: मस्स्साजोग गावात झालेल्या जलसंधारणाच्या उल्लेखनीय कामाची दखल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून घेण्यात आली.

Jagdish Pansare

Marathwada News : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या झाल्यापासून हे गाव राज्यभरात चर्चेत आले. पण ही चर्चा चांगल्या अर्थाने होत नव्हती, तर वाईट अर्थाने. मात्र याच मस्साजोगच्या प्रभारी सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीत स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची केंद्र सरकारने दखल घेतली आणि सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीत आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मस्साजोगवासियांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरत आहे.

मस्स्साजोग गावात झालेल्या जलसंधारणाच्या उल्लेखनीय कामाची दखल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून घेण्यात आली. (Beed News) त्यानंतर प्रभारी सरपंच वर्षा सोनवणे यांना स्वातंत्र्यदिनी निमित्त दिल्लीत आयोजित चार दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मस्साजोग गावाची निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल बुधवारी (ता.13) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सरपंच व गावकऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

तालुक्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मस्साजोग गावाच्या विकासासाठी काम केले. परंतू सिंचन प्रकल्प नसल्याने शेतकर्‍यांच्या शेताच्या सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होती. (Delhi) त्यामुळे ग्रामस्थांच्या श्रमदानातून गाव शिवार पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनने जलसंधारणाची कामे केली. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात शेतीच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अपेक्षित प्रमाणात सुटला नाही.

रात्रंदिवस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे तरूण सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्दयपणे हत्या करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरून गेले होते. गावाच्या विकासाचा ध्यास असलेल्या तरूण सरपंचाच्या हत्येनंतर संपूर्ण मस्साजोग गावावर शोककळा पसरली. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर काढण्यात आलेल्या आंदोलनाने महाराष्ट्र ढवळून निघाला होता.

त्यानंतर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे शिवार पाणीदार करण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भावाच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उन्हाळ्यात शिवारातील नदीच्या रूंदीकरण व खोलीकरणाचे दर्जेदार काम झाले. मे महिन्यात झालेल्या पावसाचे पाणी शिवारातच अडल्याने शिवार पाणीदार होण्यास मदत झाली. तसेच जमिनीतील पाणी पातळीत वाढ शिवारातील विहिरी व बोअरच्या माध्यमातून शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला.

या जलसंधारणाच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय कार्यक्रमासाठी मस्साजोग या गावाची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमास मस्साजोगच्या प्रभारी सरपंच श्रीमती वर्षा सोनवणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सरपंच वर्षा सोनवणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT