Beed Collector News : खबरदार नेत्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचे फोटा लावाल तर! बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश..

Beed District Collector orders action against individuals using photos of persons with a criminal background on banners : अजित पवार यांच्या सूचनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका स्वीकारत बॅनरबाजीच्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
Beed District Collector News
Beed District Collector NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा विविध कारणांमुळे राज्यभरात चर्चिला जात आहे. विशेषत: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, परळीचे व्यापारी महादेव मुंडे, त्याआधी सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून झालेली हत्या व दरोडे, महिला, विद्यार्थीनींवरील अत्याचाराच्या घटनांनी जिल्ह्याची राज्यभरात बदनामी झाली. बदनामीचा हा शिक्का पुसून बीड जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न सरकारमधील काही मंत्री आणि जिल्हा प्रशासन करू पाहत आहेत.

परंतु राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व जिल्ह्यात लावले जाणारे शुभेच्छा बॅनर सध्या वादाचा विषय ठरत आहेत. त्याला कारण म्हणजे त्यावर खूनाचे आरोप असलेल्या, तुरुंगातील आरोपींचे सर्रास वापरण्यात येणारे फोटो. बीड (Beed News) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या जेव्हा प्रकार निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी जिल्हा प्रशासनाला खडेबोल सुनावत हे प्रकार रोखण्याचे आदेश दिले होते.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सूचनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका स्वीकारत बॅनरबाजीच्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचे होर्डिंग वर फोटो लावल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच बीडमध्ये नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्ते यांचे फोटो झळकले होते.

Beed District Collector News
Jayant Patil-Ajit Pawar Video : पक्षफुटीनंतर जयंत पाटील-अजितदादा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, रोहित पवारही राहणार उपस्थित!

यावर टीका झाल्यानंतर प्रशासनाने काही बॅनरवर कारवाई केली. परंतु हे प्रकार अजूनही सुरूच आहेत. या शिवाय अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याबद्दल पालकमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी आपल्या दौऱ्यात नाराजी व्यक्त केली होती. गुन्हेगारांचे फोटो बॅनरवर झळकल्याच्या प्रकारावरही त्यांनी संताप व्यक्त केला होता. अजित पवारांच्या स्वागतसाठी लावलेले बॅनर काढल्यावरून वाद झाल्यानंतर काही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला.

Beed District Collector News
Beed Kala Kendra : धक्कादायक : बनावट कागदपत्र दाखवत बालगृहातून उचललं... अल्पवयीन मुलीला थेट कला केंद्रात नेलं!

या प्रकारानंतर अजित पवारांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना देत अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बॅनरबाजीवर अंकूश लावण्याचे प्रयत्न सूरु केले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अजित पवारांच्या 15 ऑगस्टच्या दौऱ्यापूर्वी आदेश काढून कोणत्याही सार्वजनिक फलकावरील मजकूर आक्षेपार्ह नसावा, गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, गुन्हेगारांचे फोटो त्यावर नसावेत, असे लेखी आदेश काढले आहेत.

Beed District Collector News
Beed Satish Bhosale: तुरुंगात 'खोक्या'पर्यंत पोचतोय गांजा, कैद्यांसोबत ढिशूम... ढिशूम..; बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यालाही धमकावलं

सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेची काळजी, फलक बॅनर्स लावण्यापूर्वी मजकुराची पडताळणी आवश्यक , अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई केली जाणार. तसेच सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होणारे फलक बॅनर्स नसू नये अन्यथा यावर कार्यवाही होणार, बॅनर लावताना जातीय व धार्मिक भावना लक्षात घेणे आवश्यक असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com