Valmik Karad Sarkarnama
मराठवाडा

Valmik Karad News: वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली; जेलमध्येच तीन दिवसापासून सलाईन!

Valmik Karad’s Health News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याची जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन दिवसांपासून त्याच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Jagdish Pansare

Beed politics : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्याच्यावर बीडच्या कारागृहातच उपचार सुरू असल्याचे समजते. त्याला सलाईन लावण्यात आले आहे.

प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून वाल्मीक कराड हा बीडच्या कारागृहात कैद आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीकसह सात आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई आणि बीडच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

दरम्यान वाल्मीक कराडची प्रकृती अनेकदा बिघडली. कधी छातीत दुखत असल्याची तक्रार तर कधी अशक्तपणा या कारणामुळे त्याला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून वाल्मीक कराड्याला लघवी करताना त्रास होत असल्याची तक्रार त्याने तुरूंग अधिकार्‍यांकडे केली होती.

त्यानंतर जेलमध्येच त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सलाईन लावण्यात आले होते. वाल्मीक कराड याला युरोसिसटायटीएस नावाचा संसर्ग झाल्याची चर्चा आहे. कारागृहात सलाईन लावल्यानंतरही त्याच्या प्रकृत फारशी सुधारणा नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे सांगीतले जाते.

कराडला अचानक त्रास सुरू झाल्याने मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने कारागृहात जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर कारागृहातच सलाईन लावून त्याच्यावर उपचार केले जात होते. दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात यूरोलॉजिस्ट नसल्याने वाल्मीक कराडला आज किंवा उद्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT