PMC News: PMC मध्ये मोठा खांदेपालट! लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना झटका; आयुक्तांचा शिस्तीचा बडगा

PMC Deputy Commissioners Transfers News: पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारत आयुक्तांनी प्रशासनात शिस्तीचा स्पष्ट संदेश दिला आहे.
PMC Deputy Commissioners Transfers News
PMC Deputy Commissioners Transfers NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या बदल्यांचा मोठा 'खांदेपालट' करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि मलईदार खाती मिळवण्यासाठी राजकीय लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे. दक्षता, आकाशचिन्ह, सामान्य प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांसह अन्य ठिकाणच्या बदल्या केल्या आहेत.

PMC Deputy Commissioners Transfers News
Backward Class Reservation News: ओपन कॅटेगरीत मागासवर्गीयांना एन्ट्री मिळणार? महाधिवक्त्यांच्या अभिप्रायानंतर फडणवीस सरकार घेणार निर्णय

सर्वाधिक चर्चेत आणि वादात सापडलेला आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्याकडून काढून तो संदीप कदम यांच्याकडे दिला आहे . प्रशासनावर लक्ष ठेवणाऱ्या दक्षता विभागाची जबाबदारी आता प्रसाद काटकर (प्रभारी) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाची सूत्रे आता किशोरी शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. सांस्कृतिक व क्रीडा विभाग हा उपायुक्त डॉ. संतोष टेंगले यांच्याकडे दिला आहे.

अन्य खात्यात ही बदल करण्यात आला आहे. अतिक्रमण निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मिळकतकर या विभागात कोणतेही बदल नाहीत. दरम्यान महत्वाचे खाते मिळावेत यासाठी काही उपायुक्त लाॅबिग करत होते. त्यांना कमी महत्त्वाचे खाते दिले आहेत.

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी अभियांत्रिकी संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले.यामध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

PMC Deputy Commissioners Transfers News
SSC Exam: दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील गैरप्रकारांवर आता थेट कारवाई; राज्य मंडळ कायद्यात करणार बदल

बदली झालेले अधिकारी आणि सोपविलेले विभाग

  1. जगदीश खानोरे (मुख्य अभियंता ): यांच्याकडे यापूर्वी मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागाची जबाबदारी होती. आता त्यांची नियुक्ती 'परम प्रकल्प' (येथे करण्यात आली आहे.

  2. विशाल हरीभक्त (अधीक्षक अभियंता ): यांची मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागातून 'भवन रचना विभाग' येथे बदली करण्यात आली आहे.

  3. रोहिदास गव्हाणे (कार्यकारी अभियंता): हे यापूर्वी मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागात कार्यरत होते. आता 'पथ विभागात बदली केली आहे.

  4. दिनेशकुमार गिरोल्ला (कार्यकारी अभियंता): अनेक वर्ष दक्षता विभागात कार्यरत आहेत. आता दक्षता सोबतच मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागाचे खातेप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

  5. अशित जाधव (अधीक्षक अभियंता): यांच्याकडची पथ विभागाची जबाबदारी काढून .'पाणीपुरवठा विभाग' सोपविण्यात आला आहे.

  6. शिंदे बिपीन (कार्यकारी अभियंता ): यांच्याकडील भवन रचना विभागाचा प्रभारी पदभार काढून आता 'बांधकाम विभागाची जबाबदारी दिली ) आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com