MLA Suresh Dhas  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : बीड, परळी नव्हे तर आता मस्साजोगमध्ये जाऊन धसांनी रान पेटवलं; म्हणाले, 'कराडसह आरोपींना 'व्हीआयपी ट्रीटमेंट'...'

Massajog villagers BJP MLA Suresh Dhas VIP treatment Walmik Karad Beed Santosh Deshmukh murder jail : आमदार सुरेश धस यांनी परळीमधील मस्साजोग गावच्या ग्रामस्थांची भेट घेतली.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग ग्रामस्थांची भाजप आमदार सुरेश धस यांनी आज भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी हत्येच्या कटातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळत असल्याची तक्रार केली.

आमदार धस यांनी ग्रामस्थांनी या 'व्हीआयपी ट्रीटमेंट'संदर्भातील 13 मुद्यांबाबत वेळेनुसार तक्रार केल्याचे म्हटले आहे. इतक्या 'बेक्कार' घटनेतील आरोपींना मटण मिळत असेल, तर त्यांना जेलच बरा वाटेल, असे म्हणत, या 'व्हीआयपी ट्रीटमेंट'मध्ये असलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी करणार आहे, अशी आक्रमक भूमिका आमदार धस यांनी घेतली आहे.

भाजप आमदार सुरेश धस आज परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समर्थकांनी आमदार धस यांना दोन ठिकाणी काळ झेंडे दाखवले. तणावाचे वातावरण होते. यात देखील आमदार धस यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंब उपस्थित होते.

मस्साजोग ग्रामस्थांनी यावेळी भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांच्याकडे वाल्मिक कराडसह आरोपींना जेलमध्ये मिळत असलेल्या 'व्हीआयपी ट्रीटमेंट'बाबत तक्रार केली. ही तक्रार 13 मुद्यांवर वेळेसहीत असून, ती ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात दिल्याचा दावा, आमदार धस यांनी केला आहे.

मटण पुरवल्याची तक्रार

आमदार धस म्हणाले, "इतकी 'व्हीआयपी ट्रीटमेंट' इतक्या बेक्कार घटनेमधल्या आरोपींना दिली जात असेल, तर लोकांना जेलमध्येच राहावं वाटेल. त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या सोबतच्या बॅग देणे, त्यांना मटण पुरवल्याचे देखील पुरावे आहेत. हे पुरावे वेळेसहीत आहेत". यात पोलिस देखील असल्याचा संशय आहे. याची चौकशी करून यातील पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.

मस्साजोग ग्रामस्थांच्या काय आहेत मागण्या

- वाँटेड कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करा.

- केज पोलिस ठाण्यातील प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांच्यावरती कारवाई करा. सहआरोपी करा.

- सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा.

- संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात यावा.

- आरोपी फरार असताना मदत करणाऱ्या बी-टीम वरती तात्काळ कार्यवाही करून त्यांना देखील सहआरोपी करा

- संजय केदार, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, डॉ. संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी या लोकांवरती कारवाई करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT