Suresh Dhas : आका... आका... म्हणत हादरून सोडणाऱ्या सुरेश धसांना मुंडे समर्थकांनी दोनदा दाखवले काळे झेंडे; म्हणाले, 'आष्टीत येतीलच की...' (VIDEO)

BJP MLA Suresh Dhas Parli Beed NCP Minister Dhananjay Munde : भाजप आमदार सुरेश धस आज परळी दौऱ्यावर असून, त्यांना मंत्री धनंजय मुंडे समर्थकांनी दोन ठिकाणी काळे झेंडे दाखवले आहेत.
Suresh Dhas On Parli
Suresh Dhas On ParliSarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजप आमदार सुरेश धस आज बीड जिल्ह्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांना मंत्री मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाला समोरे जावे लागले.

मुंडे यांच्या समर्थकांनी आमदार धस यांनी दोन ठिकाणी काळे झेंडे दाखवले. यावर आमदार सुरेश धस यांनी लोकशाही मार्गाने जशास तसे उत्तर देऊ. ते देखील आष्टीला येतील, असा इशारा दिला.

बीडमधील (BEED) रपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा अटकेत आहे. यानंतर मंत्री मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. या हत्येतील घटनेनंतर मंत्री मुंडे यांची बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवरून घेरले गेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांच्यासह स्थानिक आमदारांनी बीडमधील गुंडगिरीविरोधात आक्रमक झाले आहे.

Suresh Dhas On Parli
Buldhana Crime : अबब! 12 कोटीची 'अफू'ची रोपं; दोन-चार असतील, असे वाटणाऱ्या पोलिसांना सापडलं घबाड

भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी त्यांच्याकडील आरोपांना धारच चढवली आहे. यातून ते रोज संतोष देशमुख हत्येप्रकरणात रोज नवनवे खुलासे करत आहेत. यातच आमदार धस आणि मंत्री मुंडे यांची भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भेट झाली. या तिघांमध्ये चार तास बैठक झाल्याची माहिती समोर आल्याने आमदार धस यांच्यावर देखील मयत संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील ग्रामस्थांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कडवट टीका केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील नाराजी व्यक्त केली.

Suresh Dhas On Parli
SSC Exam Paper Leak : दादा भुसे 'अ‍ॅक्शन मोड'वर, पेपर फोडणाऱ्यांवर उगरला कायद्याचा दंडुका; गुन्हा दाखल, शिक्षण विभागात खळबळ

या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस आज मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते. मस्साजोग इथं देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होते. तसेच मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना देखील भेटणार होते. आमदार धस परळीत येताच, मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. राजस्थानी मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या आंदोलनाला भेट देत असताना तिथे मंत्री मुंडे समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे तिथं गोंधळ झाला.

आमदार धसांभोवती समर्थकांचे कड

यानंतर पुढे शिरसाळा इथं आमदार सुरेश धस यांना मंत्री मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध करत काळे झेंडे दाखवले. मंत्री मुंडे समर्थक एवढे आक्रमक होते की, ते आमदार धस यांच्या वाहनाला आडवे झाले. याचवेळी आमदार धस समर्थकांनी देखील धस यांच्याभोवती सुरक्षेचं कड तयार केले. आमदार धस यांना वाहनात बसून समर्थक त्यांच्या वाहनाला लटकून उभे होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्री मुंडे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.

आमदार धस यांचा मंत्री मुंडेंना इशारा

मंत्री मुंडे यांच्या समर्थकांच्या या प्रकारावर आमदार धस चांगलेच संतापले. सुरेश धस यांनी मंत्री मुंडेंचे नाव न घेता, खुले चॅलेंज देत आम्ही देखील आष्टीला आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू. मात्र लोकशाही मार्गाने रस्त्याच्या कडेला उभे राहून दाखवू. ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. जेलमध्ये गेले असताना देखील यांना कळत नाही मग काय म्हणावं. परळी पोलिसांनी आंदोलकांना पाबंदी घातली. मात्र आता पुढे पाहतो कुणाकुणाला पाबंदी घालतात , असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com