manoj jarange patil sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांचा पहिला उमेदवार ठरला?

Akshay Sabale

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी 20 ऑगस्टपर्यंत विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येऊन भेटावं, असं आवाहन केलं आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी राज्यभरातून अनेक इच्छुक आंतरवाली सराटी दाखल झाले होते. त्यात नांदेडमधील काही जणांचा सहभाग आहे.

माजी खासदार भास्करराव खतगावर यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांनीही जरांगे-पाटील यांनी भेट घेतली आहे.

लोकसभेला पक्षादेश पाळल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय मीनल खतगावकर यांनी घेतला आहे. त्यानंतर बुधवारी खतगावकर यांनी जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांची भेट घेतली. यानंतर खतगावकर यांनी पुन्हा अपक्ष लढण्याचा पुनरूच्चार केला. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मीनल खतगावकर या लोकसभेसाठी इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्यासह भाजपच्या ( Bjp ) अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, पक्षानं खतगावकर यांना थांबण्यास सांगितलं होतं. 2019 मध्ये विधानसभेा खतगावकर यांनी पक्षादेश पाळला होता. त्यानंतर विधान परिषदेवर वर्णी लागण्याची आशा खतगावकर यांना होती. तिथेही त्यांचा भ्रमनिरास झाला. पण, त्यानंतरही नायगाव विधानसभा मतदारसंघात त्या सक्रिय होत्या.

विधानसभेला तिकीट मिळेल, अशी अपेक्षा खतगावकर यांना आहे. परंतु, तिथे शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यातच बुधवारी खतगावकर यांनी जरांगे-पाटील यांची आंतरवाली-सराटी येथे भेट घेतली. जरांगे-पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावलं आहे. येत्या 29 ऑगस्टला 288 उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय जरांगे-पाटील घेणार आहेत.

त्यातच पहिल्या दिवशी मीनल खतगावकर यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर लगेच त्यांनी तिकीट न भेटल्यास अपक्ष लढण्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे जरांगे-पाटील यांचा पहिला उमेदवार ठरला? अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजप तिकीट का नाकारू शकते?

मीनल खतगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे. पण, येथून राजेश पवार हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदाराचे तिकीट कापून खतगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT