Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Pankaja Munde, Manoj Jarange Patil Sarkarnama

Manoj Jarange On Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी आमचे आभार मानले पाहिजे; मनोज जरांगे असं का म्हणाले?

Beed Politics : आम्ही त्यांना पाडलंच नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की चुकीची विधाने करू नका. मात्र त्यांनी दोन-तीन वेळा आम्हाला डिवचले.
Published on

Maharashtra Political News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यानंतर रविवारी पुण्यात शांतता रॅली पार पडली. यावेळी मनोज जरांगेंनी ओबीसी आणि मराठा समाजात कुठलाही वाद नसल्याचा दावा केला.

लोकसभेत बीडमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे जातीचे राजकारण केले नाही. आम्ही कुणाला पाडा असे म्हणालोच नाही. उलट आता आमदार पंकजा मुंडे आमचे आभार मानले पाहिजे, असेही मनोज जरांगे म्हणाले.

पुण्यातील शांतता रॅलीत मनोज जरांगे Manoj Jarange यांनी 'साम' टीव्हीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी जरांगे बोलत होते. बीड लोकसभा निवडणुकीत वंजारी विरुद्ध मराठा असे जातीचे राजकारण झाले का, या प्रश्नावर जरांगेंनी आपले मत मांडले.

ते म्हणाले, आम्ही त्यांना पाडलंच नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की चुकीची विधाने करू नका. मात्र त्यांनी दोन-तीन वेळा आम्हाला डिवचले. त्यानंतरही आम्ही कुणाला पाडा असे म्हटलोच नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

उलट त्यांनी आमचे आभार मानले पाहिजे. त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना मोठे केले. मात्र त्यांनीच त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी मराठ्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण मराठा समाजाच्या आमदारांमुळे त्या पुन्हा आमदार झाल्या आहेत. नाहीतर गेल्या काही वर्षांपासून त्या वनवासात होत्या, असा टोलाही जरांगेंनी नाव न घेता पंकजा मुंडे Pankaja Munde यांना लगावला आहे.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणजे वाद! मनोज जरांगेंचा घणाघात

दरम्यान, जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटत नसतो असा निर्धार केला. साताऱ्यातील सभेत जरांगे पाटील यांना भोवळ आली होती. प्रकृतीवर विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, सध्या मी मी मरण यातना भोगत आहे. मात्र माझ्या समाजासाठी या यातना भोगणार आहे. आता सत्तेतील मराठा आमदाराही येऊन सांगतात की समाजापेक्षा नेते मोठे नाहीत. मात्र काहीजण आपल्या पक्षाला मोठे करत आहेत, हे समाजाला कळून चुकले आहे.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Abdul Sattar : माझ्याऐवजी खोतकर मंत्री झाले तरी चालतील, अब्दुल सत्तारांनी मन केलं मोठ..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com