Tehsildar arrested in misappropriation case
Tehsildar arrested in misappropriation case Sarkarnama
मराठवाडा

तहसिलदार असतांना ८ वर्षात कमावली लाखोंची बेहिशेबी मालमत्ता ; सहा वर्षानंतर झाली अटक..

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : कळंब तालुक्यात तहसिलदार म्हणून कार्यरत असतांना २००८ ते २०१६ दरम्यान वैशाली नामगोंडा पाटील यांनी लाखोंची बेहिशोबी मालमत्ता जमवली होती. (Osmanabad) या प्रकरणी लाचलूचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. अखेर सहा वर्षांच्या तपासानंतर तत्कालीन तहसिलदार नामगोंडा यांनी तब्बल साडेबावीस लाखांची अवैध संपत्ती जमवल्याचे निष्पन्न झाले. (Anti Corruption Bureau) या प्रकरणी आता महाराष्ट्र शेती महामंडळाच्या जामगाव तालुका गंगापूर येथे स्थावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली नामगोंडा पाटील यांना अटक करून कळंब येथे नेण्यात आले आहे.

न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून या प्रकरणावर उद्या (ता.२०) रोजी सुनावणी होणार आहे. (Bribe) कळंब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असतांना वैशाली नामगोंडा यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असतांना त्यांची गंगापूरच्या जामगाव येथील महाराष्ट्र शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक म्हणून बदली झाली होती.

लाचलूचपत विभागाच्या चौकशीत वैशाली यांनी २००८ ते २०१६ या काळात अवैध मार्गाने २२ लाखांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नामगोंडा पाटील यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. उस्मानाबादच्या एसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी गंगापूर पोलिस तसेच महाराष्ट्र शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने यांनाही या कारवाई संदर्भात पत्र पाठवून माहिती दिली.

पोलिसांच्या पथकाने गंगापूर शहरातील लासूर रोडवरील राहत्या घरातून नामगोंडा पाटील यांना अटक केली. अटकेनंतर एसीबीचे पथक नामगोंडा पाटील यांना कळंब येथे घेऊन गेले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या, ता.२० सोमवारी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT