डॉ. शंकरराव चव्हाण 'जलनायक' माहितीपट लवकरच ; अशोक चव्हाणांची घोषणा

आशिया खंडातील पहिले मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाचे शिल्पकार म्हणून शंकरराव चव्हाण ओळखले जातात. (Ashok Chavan)
Let. Dr. Shankarrao Chavan Documentary Jalnayak News
Let. Dr. Shankarrao Chavan Documentary Jalnayak NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'फादर्स डे'चे औचित्य साधून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. (Ashok Chavan) त्यांचे वडिल, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर आधारित माहितीपट 'जलनायक' चे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले.

२०२०-२१ हे वर्ष जलक्रांतीचे जनक कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. (Congress) या वर्षाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलनायक- डॉ. शंकरराव चव्हाण’या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत पडणार आहे. (Marathwada)

अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन युवा प्रतिभाशाली दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया व श्रीजया सहनिर्मात्या आहेत.

आशिया खंडातील पहिले मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाचे शिल्पकार म्हणून शंकरराव चव्हाण ओळखले जातात. त्यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेल्या जायकवाडी धरणामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला.

Let. Dr. Shankarrao Chavan Documentary Jalnayak News
Shivsena : ना दानवेंच्या आरोपाला प्रत्युत्तर, ना विधान परिषदेत विजयाचा दावा ; सत्तारांचे मौन ?

या शिवाय सिंचनासाठी देखील जायकवाडी धरण वरदान ठरले आहे. जायकवाडी धरणामुळे खऱ्या अर्थाने मराठवाड्यात जलक्रांती आली. सिंचन आणि जलस्त्रोताच्या क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांनी केलेले कार्य पाहता त्यांना जलनायक म्हणून संबोधले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com